लॉकडाऊनमध्ये वेळ जात नाही; म्हणून 'हा' आवलिया ४० दिवस शरीरावर काढत बसला टॅटू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 06:05 PM2020-05-04T18:05:32+5:302020-05-04T18:25:47+5:30
आता या व्यक्तीने आपल्या तोंडावर फक्त टॅटू काढायचा बाकी ठेवला आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. सतत घरी बंद खोलीत राहिल्यामुळे अनेकांना ताण-तणावाचा सामना करावा लागत आहे. ताण कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधताना दिसून येत आहेत. कोणी सोशल मीडीयावर, कोणी वेगवेगळे पदार्थ तयार करून आपला वेळ घालवायचा प्रयत्न करत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत.
लंडनमधील वॉथेम्स्टोचा रहिवासी असलेल्या क्रिस वुडहेड नावाच्या व्यक्तीने लॉकडाऊनमध्ये विरंगुळा म्हणून एक वेगळीच शक्कल लढवली आहे. मागील ४० दिवसात रोज स्वतःच आपल्या अंगावर टॅटू काढत आहे. आता या व्यक्तीने आपल्या तोंडावर फक्त टॅटू काढायचा बाकी ठेवला आहे.
क्रिस यांनी सांगितलं की, लॉकडाऊनच्या काळात वेळ घालवण्यासाठी आणि ताण दूर करण्यासाठी प्रत्येक दिवशी एक टॅटू काढायला सुरूवात केली. सुरूवातीपासूनच मला टॅटू काढण्याचा छंद होता. ब्रिटेनचे प्रसिध्द असलेले टॅटू आर्टीस्ट डंकन एक्स हे माझे प्रेरणास्त्रोत आहेत. ( हे पण वाचा-...म्हणून 'या' देशातील डॉक्टरांना विवस्र होऊन करावा लागला निषेध)
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिस रोज दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत शरीरातील ज्या भागावर टॅटू काढायचा आहे असा भाग शोधतात. त्यांच्या प्रत्येक टॅटूमध्ये एक अर्थ दडलेला आहे. इतकंच नाही तर पायांच्या तळव्यावरील टॅटूमध्ये सुद्धा अर्थ दडलेला आहे. क्रिस टॅटू तयार करत असताना जुन्या टेक्निकचा वापर करतात. ही टेक्निक सध्याच्या टॅटू गनच्या तुलनेत कमी वेदनादायक ठरणारी आहे. त्यांच्यामते टॅटू काढण्याच्या या थेरेपीमुळे आनंद मिळतो. सध्या क्रिस लॉक़डाऊन संपण्याची वाट पाहत आहेत. ( हे पण वाचा-आली रे आली! सोशल डिस्टेंसिंगची बाईक आली, फोटो पाहताच व्हायरल झाली...)