अरे देवा! एकत्र ३ श्रीमंत लोकांची 'गर्लफ्रेन्ड' बनली ही भारतीय तरूणी, महिन्याला कमावते लाखो रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 03:15 PM2022-02-17T15:15:50+5:302022-02-17T15:16:18+5:30
Asha Chopra : तीन श्रीमंत लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये ठेवल्याने आशाची एकाच महिन्यात आता लाखो रूपयांची कमाई होत आहे. आशा या तिन्ही श्रीमंत लोकांना आळी-पाळीने भेटते.
सध्या ब्रिटनमध्ये (Britain) एक भारतीय वंशाची २० वर्षीय वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. आशा चोप्रा (Asha Chopra) असं या सुंदर तरूणीचं नाव असून तिचे तीन श्रीमंत 'बॉयफ्रेन्ड' आहेत. ती तिच्या बॉयफ्रेन्ड्सना शुगर डॅडी म्हणते. म्हणजे ती शुगर बेबी आहे. ती ब्रिटनच्या शेफील्ड शहरात राहणारी आहे.
तीन श्रीमंत लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये ठेवल्याने आशाची एकाच महिन्यात आता लाखो रूपयांची कमाई होत आहे. आशा या तिन्ही श्रीमंत लोकांना आळी-पाळीने भेटते. आशा म्हणाली की, यातील एका श्रीमंत बॉयफ्रेन्डसोबत ती खरंच प्रेमात पडली आहे. त्याचं वय २९ वर्षे आहे.
आशा चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच तिला तिच्या बॉयफ्रेन्ड्सकडून मिळालेल्या गिफ्ट्सचे फोटो शेअर करत असते. आशा सर्वात खास बॉयफ्रेन्डबाबत बोलली की, 'जेव्हा मी त्याच्यासोबत असते तेव्हा मला फार चांगलं वाटतं. मुळात मी जेव्हा त्याच्यासोबत बोलते तेव्हा मला असं वाटत नाही की, आता बोलणं झालं आणि मला गिफ्ट मिळणार. जे इतरांसोबत वाटतं'.
ती पुढे म्हणाली की, 'मी छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करणं सुरू केलं आहे. जसे की, जेव्हा तो हसतो, त्याचा सेन्स ऑफ ह्यूमर पूर्णपणे माझ्यासारखाच आहे. ज्याप्रकारे तो मला बघतो, अशाच खूपसाऱ्या गोष्टी आहेत'.
'द सन'च्या रिपोर्टनुसार, आशाने १८ वयाची असताना श्रीमंत बॉयफ्रेन्डचा शोध सुरू केला होता. यासाठी तिने काही वेबसाइट्सची मदत घेतली. ती म्हणाली की, आधी ती जॉब करत होती. तिची एका दिवसाची कमाई ८ हजार रूपयांच्या आसपास होती. त्यानंतर तिने फोनवर लोकांसोबत बोलणं सुरू केलं. तेव्हा तिला १० मिनिटे बोलण्यासाठी १० हजारांपेक्षा जास्त रूपये मिळत होते. यानंतर तिला जाणीव झाली की, ती गर्लफ्रेन्ड बनूनही पैसे कमावू शकते.
आता आशा चोप्रा रिलेशनशिपमधून एका महिन्यात ४ ते ६ लाख रूपयांपर्यंतची कमाई करते. यात गिफ्ट आणि इतरही वस्तूंचा समावेश आहे. नुकताच तिला गिफ्टमध्ये आयफोन १३ मिळाला होता. कारण तिचा फोन तुटला होता. तेच ती ज्या ब्यूटी ट्रिटमेंट करते त्याचेही पैसे तिचे श्रीमंत बॉयफ्रेन्ड देतात.