'हा' आहे जगातला सर्वात लांब इंग्रजी शब्द, वाचण्यासाठी लागतो तब्बल साडे तीन तासांचा वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 03:32 PM2019-08-24T15:32:43+5:302019-08-24T15:41:48+5:30
सामान्यपणे लोकांना जर Czechoslovakia (झेकोस्लोवाकिया) सारख्या इंग्रजी शब्दांचा उच्चार व्यवस्थित करणं कठीण होतं.
सामान्यपणे लोकांना जर Czechoslovakia (झेकोस्लोवाकिया) सारख्या इंग्रजी शब्दांचा उच्चार व्यवस्थित करणं कठीण होतं. अशात एक असाही इंग्रजी शब्द आहे ज्याचा उच्चार करायला बसलं तर हा एक शब्द वाचायला साडे तीन तासांचा वेळ लागतो, असा दावा केला जातो. आता तुम्ही असा विचार करत असाल की, असा कोणता शब्द आहे. चला तर जाणून घेऊ या शब्दाबद्दल...
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, इंग्रजीच्या सर्वात लांब शब्दात १, ८९, ८१९ अक्षरे आहेत आणि या शब्दाचा योग्य उच्चार करण्यासाठी तुम्हाला साडे तीन तासांचा वेळ लागतो. हा शब्द मनुष्याच्या शरीरात आढळणाऱ्या टिटिन नावाच्या एका प्रोटीनचं रासायनिक नाव आहे.
वैज्ञानिकांनुसार, मानवी शरीरात २० लाखांपेक्षा अधिक प्रोटीन आहे. जे अमीनो अॅसिडपासून तयार झोलेले असतात. मनुष्याच्या शरीरातील टिटिन हा एकच माहिती असलेला सर्वात लांब प्रोटीन आहे. ज्यात २६ हजारांपेक्षा अधिक अमीनो अॅसिड असतात.
आधी टिटिनच्या रासायनिक नावाला इंग्रजीच्या शब्दकोषात जागा देण्यात आली होती. पण या नावामुळे जेव्हा जागेची अडचण झाली, तेव्हा हा शब्द काढून टाकण्यात आला. आता याला केवळ टिटिन नावाने ओळखलं जातं.
टिटिन प्रोटीनचा शोध रेजी नटोरी यांनी १९५४ मध्ये लावला होता. त्यानंतर १९७७ मध्ये कोस्सक मरूयामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून यावर शोध केला आणि या प्रोटीनचं नाव कोन्नेक्टिन असं ठेवलं. त्यानंतर दोन वर्षांनी कुआन वांग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही या प्रोटीनवर अभ्यास केला आणि याला टिटिन असं नाव दिलं.