१५ वयाची असून 'ती' दिसत होती ६० वयाची, विद्यार्थ्यांच्या टोमण्यांना कंटाळून केली सर्जरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 10:56 AM2020-02-01T10:56:04+5:302020-02-01T11:00:26+5:30
सुंदर आणि तरूण दिसण्यासाठी कितीतरी अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केली. अनेक सर्वसामान्य महिलाही प्लास्टिक सर्जरी करतात. पण प्लास्टिक सर्जरीची एक अनोखी घटना समोर आली आहे.
(Image Credit : dailymail.co.uk)
सुंदर आणि तरूण दिसण्यासाठी कितीतरी अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केली. अनेक सर्वसामान्य महिलाही प्लास्टिक सर्जरी करतात. पण प्लास्टिक सर्जरीची एक अनोखी घटना समोर आली आहे. चीनच्या लियोनिंग शहरात एका मुलीने लोकांच्या टोमण्यांमुळे प्लास्टिक सर्जरी केल्याची घटना घडली आहे.
१५ वर्षीय जियाओफेंग तिच्या वयाच्या मुलींच्या तुलनेत चार पटीने अधिक जास्त मोठी दिसत होती. त्यामुळे शाळेत तिला विद्यार्थी चिडवत असत. जियाओफेंगची ही स्थिती तिला असलेल्या प्रोजेरिया आजारामुळे झाली होती. प्रोजेरिया हा एका दुर्मीळ प्रोग्रेसिव्ह जेनेटिक डिसऑर्डर आहे. ज्यात लहान मुलांचं वय वेगाने वाढू लागतं. हा तोच आजार आहे ज्यावर 'पा' सिनेमा आधारित होता.
या आजाराने पीडित जास्तीत जास्त १२ वर्षे जगतात
सरासरी प्रोजेरियाने पीडित लहान मुले १२ वर्षेच जगतात. पण अनेकदा काही मुले २० वयापर्यंतही जगतात. जियाओफेंगला जेव्हा हा आजार झाला तेव्हा याचा प्रभाव केवळ तिच्या चेहऱ्यावरच दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर वयोवृद्धांसारख्या सुरकुत्या आल्या होत्या. त्यामुळेच तिने सर्जरी करून चेहऱ्यावरील एक्स्ट्रा फॅट काढलं.
जियाओफेंगच्या वडिलांनी सांगितले की, एक वर्षाची झाली होती तेव्हा जियाओफेंगच्या चेहऱ्या या आजाराचा प्रभाव दिसू लागला होता. वय वाढण्यासोबत चेहऱ्यावरील सुरकुत्याही वाढू लागल्या होत्या. त्यामुळे ती म्हातारी दिसत होती. शाळेत तिला आज्जी म्हणून चिडवत होते. अखेर तिने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक संस्थापर्यंत तिची माहिती पोहोचली. त्यांनीच या सर्जरीसाठी पैसा जमा केला.
गेल्या महिन्यात तिचं ऑपरेशन झालं. जियाओफेंगचे डॉक्टर शी लिंग्जी यांनी सांगितले की, त्यांनी सर्जरी करून ७ सेमी त्वचा तिच्या चेहऱ्याहून काढली. त्यासोबतच तिच्या नाकाजवळची आणि तोंडाजवळची त्वचाही व्यवस्थित केली.
जियाओफेंग म्हणाली की, सर्जरीआधी मला अनेकजण आंटी आणि आज्जी म्हणत होते. पण मी काही बोलले नाही. पण आता सर्जरी केल्यावर मी शाळेत गेल्यावर मला कुणी सुंदर म्हणू नये असं मला वाटतं. त्यांनी मला इतर टीनएजर्ससारखं स्वीकारावं.