नोकरीचं टेन्शन संपलं! 'तो' झाला करोडपती, 20 वर्षांसाठी लागली लॉटरी; दरवर्षी मिळणार 42 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 05:02 PM2022-12-29T17:02:03+5:302022-12-29T17:35:21+5:30
व्यक्तीने इतक्या मोठ्या रकमेची लॉटरी जिंकली आहे की पुढील 20 वर्षे त्याला दरवर्षी तब्बल 42 लाख रुपये मिळत राहतील.
धकाधकीच्या जीवनात, जर तुम्हाला लॉटरी लागली, ज्यामध्ये तुम्हाला पुढच्या 20 वर्षांसाठी दरवर्षी खूप मोठी रक्कम मिळेल असं कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, तुम्हाला खोटं वाटेल. पण हो हे खरं आहे. एका व्यक्तीसोबत ही घटना घ़डली आहे. या व्यक्तीने इतक्या मोठ्या रकमेची लॉटरी जिंकली आहे की पुढील 20 वर्षे त्याला दरवर्षी तब्बल 42 लाख रुपये मिळत राहतील.
fox5dc.com या वेबसाइटनुसार, बोस्टनचे रहिवासी असलेल्या कलील यांनी एक मिलियन डॉलरची लॉटरी जिंकली आहे. म्हणजेच जवळपास 8.28 कोटी रुपये आहेत. मॅसाच्युसेट्स स्टेट लॉटरी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कलील हे नॉर्थ एंडेवरचे रहिवासी आहेत. ते मेन्स लीग हॉकी खेळण्यासाठी जात असताना कारमध्ये गॅस भरण्यासाठी थांबले. गॅस स्टेशनवरच त्यांनी पाण्याची बाटली आणि लॉटरीचं तिकीट घेतलं.
लॉटरी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कलीलने लॉटरीसाठी पाचवा क्रमांक निवडला. यामागेही एक रहस्य होते. कलीलच्या मुलाचा जन्म मे महिन्यात झाला होता, म्हणून त्याला पाच हा आपला भाग्यशाली क्रमांक वाटत होता. या विजयानंतर तिकीट विक्री करणाऱ्या दुकानाचे नशीबही उघडले.
लॉटरी कंपनी त्याला $10,000 (रु. 8.28 लाख) बोनस देईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने लॉटरी जिंकली त्याने वार्षिक पेमेंटचा पर्याय निवडला आणि आता त्याला पुढील 20 वर्षांपर्यंत दरवर्षी 50 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 42 लाख रुपये मिळत राहतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"