ट्रक ड्रायव्हरचं पालटलं नशीब, जेव्हा त्याला अचानक मिळाले 7.9 कोटी रूपये; जाणून घ्या कसे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 10:52 AM2022-07-01T10:52:56+5:302022-07-01T10:53:12+5:30

Scratch Off Lottery Ticket: त्याला सुरूवातीला वाटलं की, त्याला 1.5 लाख रूपयांची लॉटरी लागली आहे. पण नंतर जेव्हा त्याने व्यवस्थित पाहिलं तर त्याला समजलं की, त्याला 7.9 कोटी रूपयांची लॉटरी लागली.

Lottery winner truck driver scratch off lottery ticket michigan united states | ट्रक ड्रायव्हरचं पालटलं नशीब, जेव्हा त्याला अचानक मिळाले 7.9 कोटी रूपये; जाणून घ्या कसे...

ट्रक ड्रायव्हरचं पालटलं नशीब, जेव्हा त्याला अचानक मिळाले 7.9 कोटी रूपये; जाणून घ्या कसे...

Next

Scratch Off Lottery Ticket: अमेरिकेतील एका ट्रक ड्रायव्हरने मिशिगनमध्ये एक स्क्रॅच-ऑफ लॉटरी तिकिट खरेदी केली होती. नशीबाने त्याला लॉटरी लागली, पण त्याचा त्यावर विश्वासच बसत नव्हता. इलिनोइसच्या 48 वर्षीय व्यक्तीने त्याचा लॉटरी नंबर पाहिला आणि त्याला त्याच्या लॉटरीचा दावा करण्यासाठी एक मेसेज आला. त्याला सुरूवातीला वाटलं की, त्याला 1.5 लाख रूपयांची लॉटरी लागली आहे. पण नंतर जेव्हा त्याने व्यवस्थित पाहिलं तर त्याला समजलं की, त्याला 7.9 कोटी रूपयांची लॉटरी लागली.

लॉटरी लागलेल्या व्यक्तीने सांगितलं की, 'मी एक ट्रक ड्रायव्हर आहे. त्यामुळे मी मिशिगनमध्ये आहे आणि इथे असताना लॉटरी तिकिट खरेदी करणं मला आवडतं'. मिशिगन लॉटरीच्या अधिकाऱ्यांनुसार, ट्रकवाल्याने मट्टावनच्या एका गॅस स्टेशनवरून मिस्ट्री मल्टीप्लायर स्क्रॅट ऑफ खरेदी केलं होतं. विजेता पुढे म्हणाला की, मी बारकोड व्यवस्थित पाहिला आणि तिकीट खरेदी करताच स्क्रॅच केलं. जेव्हा मला क्लेमसाठी मेसेज आला तेव्हा मला वाटलं की, मला 1.5 लाख रूपयांची लॉटरी लागली.

तो म्हणाला की, जेव्हा मी ट्रकमध्ये परत आलो तेव्हा मी तिकीट स्क्रॅच केलं आणि तेव्हा पाहिलं की,  मी 1 मिलियन डॉलरचं प्राइज जिंकलो तर मला विश्वास बसला नाही. बराच वेळ तर मी स्तब्ध होऊन बसलो होतो. मी जिंकल्यावरही लॉटरीच्या ऑफिसमध्ये फोन केला नाही. फोन केला तेव्हा माझा यावर विश्वास बसला. तो म्हणाला की, तो या पैशातून एक नवीन गाडी खरेदी करणार आणि बाकी पैसे बचत करणार.
 

Web Title: Lottery winner truck driver scratch off lottery ticket michigan united states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.