गर्लफ्रेंडमुळे कर्जबाजारी झाला, पाच वर्षाने तिचं असं गुपित समोर आलं बॉयफ्रेंड 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:06 AM2024-01-05T10:06:17+5:302024-01-05T10:06:44+5:30

तो गेल्या पाच वर्षापासून तिला आणि तिच्या पैसे देत होता. त्याने त्याना 2 कोटी रूपयांपेक्षा अधिक दिले. आता तो कर्जबाजारी झाला आहे. 

Love scam : Man gave more than 2 crore over five years to married girlfriend relationship | गर्लफ्रेंडमुळे कर्जबाजारी झाला, पाच वर्षाने तिचं असं गुपित समोर आलं बॉयफ्रेंड 'कोमात'

गर्लफ्रेंडमुळे कर्जबाजारी झाला, पाच वर्षाने तिचं असं गुपित समोर आलं बॉयफ्रेंड 'कोमात'

अफेअरच्या अनेक अजब घटना समोर येत असतात. कधी दोन विवाहित लोकांचं अफेअर असतं तर कधी एक अविवाहित आणि एक विवाहित व्यक्ती यांचं अफेअर असतं. यांच्या अनेक अजब घटनाही समोर येत असतात. अशीच एका व्यक्तीसोबत घडलेली घटना सध्या चर्चेत आहे. या व्यक्तीला माहीत नव्हतं की, त्याची पाच वर्षापासून असलेली गर्लफ्रेंड विवाहित आहे. त्याला ही बाब समजल्यावर धक्का बसला कारण तो गेल्या पाच वर्षापासून तिला आणि तिच्या पैसे देत होता. त्याने त्याना 2 कोटी रूपयांपेक्षा अधिक दिले. आता तो कर्जबाजारी झाला आहे. 

या व्यक्तीचं नाव वांग युआन आहे तर त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव झांग ली आहे. जेव्हा पोलिसांनी याची चौकशी केली तेव्हा वांग याला समजलं की, तो लव्ह स्कॅमचा शिकार झाला आहे. चीनमधील ही घटना आहे. 

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये वांगच्या बॉसला समजलं की, तो कर्जात बुडालेला आहे. तो याबाबत वांगसोबत बोलला. पण वांगला यावर विश्वास बसला नाही की, त्याची फसवणूक झाली आहे. यानंतर त्याचा बॉस पोलिसांकडे गेला. कारण हे प्रकरण त्याला संशयास्पद वाटत होतं.

ते पोलिसांकडे जाऊन म्हणाले की, त्यांची कंपनी जेवणाचा आणि राहण्याचा पूर्ण खर्च देते. तरीही त्यांचा कर्मचारी वांग कर्जबाजारी झाला आहे. बॉसला समजलं की, वांग याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतरांकडूनही पैसे घेतले आहेत. त्यानी जेव्हा वांगला विचारलं की, त्याला इतक्या पैशांची काय गरज आहे. तर त्याने काही उत्तर दिलं नाही. त्यांनी जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली जेव्हा समजलं की, गर्लफ्रेंडच्या छोट्या भावाची फी सुद्धा वांगने भरली होती.

याहूनही हैराण करणारी बाब म्हणजे वांगची गर्लफ्रेंड ली ही आधी विवाहित आहे आणि तिला एक मुलगाही आहे. पण वांग प्रेमात असा काही वेडा झाला होता की, त्याने बॉसचं सुद्धा काही ऐकलं नाही. तो गर्लफ्रेंड ली हिला पैसे देत राहिला. त्याने त्याच्या आजारी आईलाही कर्ज घेण्यास सांगितलं. पण झांग ली हिचं सत्य समोर आल्यावर पोलिसांनी तिला अटक केली.

तिने हे मान्य केलं की, ती आणि तिचा पती बऱ्याच महिन्यांपासून बेरोजगार होते. त्यामुळे ती वांगकडून पैसे घेत होती. तिने आपल्या पतीला सांगितलं होतं की, वांग केवळ एक मित्र आहे. वांगला जेव्हा समजलं की, त्याची फसवणूक झाली तेव्हाही तो पोलिसांना म्हणत होता की, गर्लफ्रेंड ली विरोधातील केस मागे घ्या. नंतर तो म्हणाला की, त्याने तिला माफ केलं. या घटनेवरून लोक सोशल मीडियावर वेगवेगळी चर्चा करत आहे. 

Web Title: Love scam : Man gave more than 2 crore over five years to married girlfriend relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.