Love Story : प्रेमात पडले, ती प्रेग्नंट झाली अन् दोघेही वेगळे झाले; 23 वर्षानी पुन्हा दोघेही एकत्र आले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 03:14 PM2022-12-22T15:14:28+5:302022-12-22T15:18:34+5:30

Love Story : स्वीडनमध्ये राहणारी जेनेट 1992 मध्ये थायलॅंडच्या फीफी आयलॅंडवर सुलाई नावाच्या मासे पकडणाऱ्याला भेटली होती. त्यावेळी जेनेट 2२ वर्षांची होती. जेनेटने सांगितलं की, सुरूवातीलाच लक्षात आलं की, सुलाईला इंग्रजी बोलता येत नाही.

Love Story : Woman reached abroad to meet lover after 23 years became pregnant video viral | Love Story : प्रेमात पडले, ती प्रेग्नंट झाली अन् दोघेही वेगळे झाले; 23 वर्षानी पुन्हा दोघेही एकत्र आले!

Love Story : प्रेमात पडले, ती प्रेग्नंट झाली अन् दोघेही वेगळे झाले; 23 वर्षानी पुन्हा दोघेही एकत्र आले!

Next

(Image Credit : Youtube)

Love Story : एका तरूणी काही वर्षांआधी थायलॅंडमध्ये फिरायला आली होती. यादरम्यान ती एका मासे पकडणाऱ्याच्या प्रेमात पडली. दोघे काही महिने सोबत राहिले. अशात तरूणी प्रेग्नंट झाली. त्यानंतर दोघेही काही कारणाने एकमेकांपासून वेगळे झाले. या घटनेच्या 23 वर्षानतर दोघांची पुन्हा भेट झाली. या कपलने त्यांची स्टोरी एका व्हिडीओत शेअर केली आहे.

स्वीडनमध्ये राहणारी जेनेट 1992 मध्ये थायलॅंडच्या फीफी आयलॅंडवर सुलाई नावाच्या मासे पकडणाऱ्याला भेटली होती. त्यावेळी जेनेट 2२ वर्षांची होती. जेनेटने सांगितलं की, सुरूवातीलाच लक्षात आलं की, सुलाईला इंग्रजी बोलता येत नाही. असं असूनही आम्ही दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला. एकमेकांवर प्रेम करू लागलो होतो.

जेनेट म्हणाली की, तिला घरी परत जायचं नव्हतं. त्यामुळे तिने फीफी आयलॅंडवर जास्त काळ राहण्यासाठी एक होडी खरेदी केली. त्यानंतर दोघेही या होडीतून पर्यटकांना फिरायला नेत होते. जेनेट म्हणाली की, ती या आयलॅंडवर सुलाईसोबत 7 महिने राहिली. एकमेकांची भाषा त्यांना समजत नव्हती. तरीही आम्ही सोबत होतो. काही न बोलताही आम्ही दोघांनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या होत्या.

साधारण 7 महिन्यांनंतर जेनेटच्या आई-वडिलांनी तिला परत येण्यास सांगितलं. यादरम्यान जेनेटला समजलं की, ती प्रेग्नंट आहे.  ती म्हणाली की, जेव्हा ती घरी परत जात होती तेव्हा तिने सुलाईला आश्वासन दिलं होतं की, ती लवकरच परत येईल. घरी गेल्यावर साधारण दोन आठवडे ती सुलाईच्या आठवणीत रडत होती. त्यानंतर तिने स्वीडनमध्ये गर्भपात केला. 

जेनेट म्हणाली की, ती जेव्हा आई-वडिलांना म्हणाली की, सुलाईला स्वीडनमध्ये बोलवूया तर त्यांनी यासाठी नकार दिला. आई-वडील जेनेटला सुद्धा थायलॅंडला परत पाठवण्यास तयार नव्हते. तिने पुढे सांगितलं की, यानंतर जुन्या आठवणी विसरून ती आयुष्यात पुढे गेली. तेच सुलाई म्हणाला की, जेनेटने आश्वासन दिलं की, होतं की, ती परत येईल. त्यामुळे त्याने तिची 5 वर्षे वाट बघितली. जेनेट स्वीडनमध्ये राहून इंजिनीअर झाली.

जेनेटने सांगितलं की, यानंतर ती एका व्यक्तीसोबत 14 वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. त्याच्याकडून तिल दोन मुलं झाली. पण 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.  दुसरीकडे सुलाईच्या आय़ुष्यातही इटलीची एक महिला आली होती. या महिलेसोबत तो 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. सुलाईने हेही सांगितलं की, त्याने जेनेटचा सोशल मीडियावरही खूप शोध घेतला. पण त्याला ती सापडली नाही.

जेनेटने सांगितलं की, जेव्हा तिची मुले मोठी झाली तिने त्यांना सुलाईची कहाणी सांगितली. त्यानंतर ते सुट्टीत पुन्हा 17 वर्षानी फीफी आयलॅंडला गेले. इथे जेनेटची भेट सुलाईच्या भावासोबत झाली. जेनेटला बघताच सुलाईच्या भावाने तिला ओळखलं. पण जेनेटची भेट सुलाईसोबत झाली नाही. कारण तो त्यावेळी इटलीमध्ये होता. तेव्हाच जेनेटला सुलाईच्या रिलेशनशिपबाबत समजलं. 

नंतर आणखी काही वर्ष गेली. जेनेटची मुलगी सना 21 वर्षांची झाली. तेव्हा ती पुन्हा फीफी आयलॅंडला गेली. इथे सनाची भेट सलाईसोबत झाली. सनाने तिच्या आईला सुलाईचा फोटो पाठवला.

जेनेटने सांगितलं की, ठीक 23 वर्षानंतर मुलीच्या माध्यमातून तिचं सुलाईसोबत बोलणं झालं. नंतर तीन आठवड्यांनी जेनेटही थायलॅंडला पोहोचली. इथे जेनेटला रिसीव करण्यासाठी सुलाई आधीच एअरपोर्टवर पोहोचला होता. जेनेट म्हणाली की, आम्ही भेटलो तेव्हा असंच वाटलं की, आम्ही कधी वेगळे झालोच नाहीत.

यानंतर सुलाईने जेनेटसोबत स्वीडनला जाण्याचा निर्णय घेतला. पण इथे राहत असताना त्याला खूप अडचणी आल्या. स्वीडनचं वातावरण थायलॅंडपेक्षा जास्त थंड होतं. त्यानंतर जेनेट आपल्या मुलांच्या सल्ल्याने थायलॅंडला गेली आणि सुलाईसोबत राहू लागली.

Web Title: Love Story : Woman reached abroad to meet lover after 23 years became pregnant video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.