“मला वाटलं ‘तो’ माझा गैरसमज दूर करून फोन देईल, पण तसं झालं नाही, मी एकटीच घरी परतले अन्...”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 08:06 PM2021-03-12T20:06:07+5:302021-03-12T20:07:47+5:30
जैस्परची सवय होती तो नेहमी कामाच्या व्यापात प्रत्येक वेळी मोबाईल चेक करत होता, एकेदिवशी आम्ही डिनरसाठी गेलो होतो, तेव्हाही तो फोनमध्येच होता
एका महिलेने रिलेशनशिपबद्दल पोर्टलवर सांगितले की, कशाप्रकारे तिचा बॉयफ्रेंड तिचा विश्वासघात करत होता हे जाणून घेतलं, इतकचं नाही तर ज्यावेळी तिच्या बॉयफ्रेंडने याबाबत तिला सांगितलं तेव्हा तर तिला मोठा धक्काच बसला. न्यूयॉर्कमध्ये राहणारी सामंथा नावाची महिला ज्वेलरी डिझायनर आहे, सामंथाने म्हटलं की, मी माझ्या ग्लॅमरस आयुष्य आणि परफेक्ट बॉयफ्रेंडसोबत खूप आनंदात होते, आमचं आयुष्य मस्त चाललं होतं, पण अचानक एक दिवस तिचा बॉयफ्रेंड तिला धोका देत असल्याचं समजताच सगळं काही थांबलं.
सामंथा पुढे म्हणते की, जैस्परची सवय होती तो नेहमी कामाच्या व्यापात प्रत्येक वेळी मोबाईल चेक करत होता, एकेदिवशी आम्ही डिनरसाठी गेलो होतो, तेव्हाही तो फोनमध्येच होता, मला राग आला मी त्यावेळी कॉन्फ्रेसबद्दल सांगत होते, तरीही तो मोबाईलमध्ये गुंग होता. मी त्याला विचारलं तू कोणाला मेसेज करतोय, तेव्हा त्याने डेरेकला मेसेज करत असल्याचं सांगितलं, डेरेक हा आमचा कॉमन फ्रेंड होता, मी त्याला फोन देण्यास सांगितले तर अत्यव्यस्थ झाला, मी सांगितलं मला वाटत नाही तू डेरेकशी बोलतोय, जैस्पर म्हणाला, तू वेड्यासारखी का बोलतेय, आणि त्याने फोन देण्यास नकार दिला.
आम्ही कधीही एकमेकांपासून फोन लपवत नाही, आम्हाला एकमेकांचे पासवर्डही माहिती आहेत, गूगल मॅपवरून कोणत्या रेस्टॉरंटची माहिती घ्यायची असेल तर आम्ही एकमेकांचे फोन वापरतो, असं असताना त्याने मला फोन देण्यापासून नकार दिला, त्यामुळे मला आश्चर्य वाटलं, मी त्याला म्हटलं, तू जर फोन दिला नाही तर आज रात्री माझ्या घरी येऊ नको, मला वाटलं तो माझा गैरसमज दूर करून फोन देईल पण तसं झालं नाही, मी एकटीच घरी परतले, घरी परतल्यानंतर मला आठवलं की, माझ्या कपाटात जैस्परचा जुना फोन आहे, आम्ही दोघांनीही काही महिन्यांपूर्वी नवीन मोबाईल घेतले होते, तेव्हापासून जुना फोन माझ्याकडेच आहे असं सामंथा म्हणाली.
मी जैस्परचा फोन चार्जिंगला लावला आणि त्याचा पासवर्ड टाकताना माझे हात थरथर कापू लागले, अखेर मी त्याचे मेसेज वाचण्यात सुरूवात केली, माझ्या पायाखालची जमीन सरकली, मी खूप बैचेन झाले, मला झोपण्यासाठी औषधे घ्यावी लागली. दुसऱ्या दिवशी मी जैस्परला घरी बोलावले, नेहमी मी तो घरी आल्यानंतर आनंदित असायचे, परंतु त्यादिवशी माझं मन विचलित होते, मी दरवाजा उघडला, आम्ही अनोळखी असल्यासारखं एकमेकांच्या बाजूला बसलो, काही काळ शांततेनंतर मी विचारलं तूझं अफेअर कधीपासून सुरु आहे? यावर तो माझ्याकडे बघत राहिला आणि विचारलं कोणतं अफेअर?
मी हे ऐकून थक्क झाले, अखेर स्वत:ला सांभाळत म्हणाले असे किती अफेअर तुझे सुरू आहेत? यावर त्याने सांगितलं कमीत कमी ८ सुरू आहेत, त्याचे हे उत्तर ऐकल्यानंतर मला मोठा धक्काच बसला, माझा श्वास थांबला, मला जैस्परकडून ऐकायचं होतं की, हे सगळं खोटं आहे, तो मला कधीच सोडणार नाही, पण अचानक तो उभा राहिला आणि मला म्हणाला, आता मी जातो, ज्या नात्याची सुरुवात आनंदात झाली होती, अखेर ते संपलं होतं.