आंतरजातीय विवाह केल्यास बिहारमध्ये लव्हमेरेज टॅक्स

By admin | Published: May 21, 2015 05:35 PM2015-05-21T17:35:58+5:302015-05-21T17:35:58+5:30

एका प्रेमी युगुलाने आतंरजातीय विवाह केल्याने त्याच्याकडे ५० हजार रुपये लव्हमॅरेज टॅक्स मागण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Lovemare Taxes in Bihar, if inter-caste marriages | आंतरजातीय विवाह केल्यास बिहारमध्ये लव्हमेरेज टॅक्स

आंतरजातीय विवाह केल्यास बिहारमध्ये लव्हमेरेज टॅक्स

Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २१ - एका प्रेमी युगुलाने आतंरजातीय विवाह केल्याने त्याच्याकडे ५० हजार रुपये लव्हमॅरेज टॅक्स मागण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी चंदन यादव (३०) व सोनी देवी (२२)  यांनी कुटुंबियांचा विरोध पत्करून पळून जात लग्न केले. चंदंनने काही काळ एका हॉटेलमध्ये वेटरचे काम केले. परंतू, फारसे पैसे मिळत नसल्याने त्याने दोघांनी परत घरी जाण्याचा निर्णय घेतला असता त्यांच्या घरच्यांनीही त्यांना स्विकारले. परंतू, काही गावगुंडांनी चंदन याच्याकडे ५० हजाररुपये प्रोटेक्शनमनी मागितली. या गावगुंडांकडून चंदन व सोनी यांच्या कुटूंबीयांना धोका असल्याने त्यांनी स्थानिक आमदार यांच्या मदतीने काटीहार जिल्ह्याचे अधीक्षक क्षात्रनील सिंग यांच्याकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीचा तपास करून गुन्हेगारांना शिक्षा देणार असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले आहे. 

Web Title: Lovemare Taxes in Bihar, if inter-caste marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.