एका बांधकाम सुरू असलेल्या घरात शारीरिक संबंध ठेवताना पकडलं गेलं प्रेमी युगुल आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:18 PM2023-03-10T12:18:47+5:302023-03-10T12:19:07+5:30

स्थानिक लोकांनी सांगितलं की, केशव नगरमध्ये एक तरूण आणि एक तरूणी बाइकवरून आले आणि एका बांधकाम सुरू असलेल्या घरात शिरले. बराच वेळ होऊनही दोघे बाहेर आले नाही.

Lover boy and girl caught having physical relation Purnia Bihar | एका बांधकाम सुरू असलेल्या घरात शारीरिक संबंध ठेवताना पकडलं गेलं प्रेमी युगुल आणि मग...

एका बांधकाम सुरू असलेल्या घरात शारीरिक संबंध ठेवताना पकडलं गेलं प्रेमी युगुल आणि मग...

googlenewsNext

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एका बांधकाम सुरू असलेल्या घरात लपून शारीरिक संबंध ठेवत असलेल्या प्रेमी युगुलाला रंगेहाथ पकडण्यात आलं. गावातील लोकांनी त्यांना पकडलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि ते लवकरच लग्न करणार आहेत. दोघांचंही म्हणणं ऐकल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना बोलवण्यात आलं आणि त्यांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्थानिक लोकांनी सांगितलं की, केशव नगरमध्ये एक तरूण आणि एक तरूणी बाइकवरून आले आणि एका बांधकाम सुरू असलेल्या घरात शिरले. बराच वेळ होऊनही दोघे बाहेर आले नाही तेव्हा लोकांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिलं तर दोघे शारीरिक संबंध ठेवत होते.

पकडले गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की, ते पहिल्यांदाच इथे आले. लोकांनी त्यांना छापलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, ते एकमेकांवर प्रेम करतात आणि लवकरच लग्न करणार आहेत. यादरम्यान दोघेही माफी मागत होते आणि आपल्या कुटुंबियांना न बोलवण्याची विनंती करत होते. पण स्थानिक लोकांनी त्यांचं काही ऐकलं नाही.

त्यानंतर दोन्ही कुटुंबियांना बोलवण्यात आलं आणि घटनेची माहिती दिली गेली. यानंतर दोन्ही परिवार लग्नासाठी तयार झाले. कुटुंबिय म्हणाले की, पंडिताकडून मुहूर्त काढून लग्न ठरवलं जाईल. तेच या प्रकरणावर पोलिसांनी सांगितलं की, हे प्रेम प्रसंगाचं प्रकरण होतं. लोकांनी वाद मिटवला. कुटुंबिया जोडप्याचं लग्न लावून देतील.

Web Title: Lover boy and girl caught having physical relation Purnia Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.