बोंबला! रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला जात होता प्रियकर, अचानक विहिरीत पडला आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 12:57 PM2022-02-01T12:57:59+5:302022-02-01T12:58:24+5:30
इथे एका प्रियकराला रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला जाणं महागात पडलं. तो प्रेयसीला भेटू तर शकला नाही.
जगभरात सतत अनेक विचित्र घटना घडत असतात. कधी त्या वाचून त्यांवर विश्वास बसत नाही तर कधी त्या अवाक् करणाऱ्या असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशची (Utttar Pradesh) राजधानी लखनौमधून समोर आली आहे. इथे एका प्रियकराला रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला जाणं महागात पडलं. तो प्रेयसीला भेटू तर शकला नाही, उलट काही तास त्याचा जीव टांगणीला लागला होता.
एक तरूणी रात्रीच्या अंधारात आपल्या प्रेयसीला भेटायला गावात जात होता. तेव्हा अचानक रस्त्यात तो विहिरीत पडला. वेगळ्याच आनंदात जात असलेला हा तरूण अचानक या घटनेने हैराण झाला आणि विहिरीतून वाचवा...वाचवा ओरडू लागला होता. या तरूणाचा आवाज ऐकून तिथे ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी त्याचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यांनी कसं तरी तरूणाला विहिरीतून बाहेर काढलं.
ही घटना लखनौच्या माती गावातील आहे. रविवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास तरूण त्याच्या प्रेयसीला भेटायला जात होता. अंधार जास्त असल्याने त्याला रस्त्यातील विहीर काही दिसली नाही. तो प्रेयसीला भेटण्याआधीच या विहिरीत पडला. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी वाचवा...वाचवा ओरडत होता. अशात तेथून जाणाऱ्या पोलिसांना त्याचा आवाज आला. त्यांनीच त्याला बाहेर काढलं.
'आजतक'च्या वृत्तानुसार, पोलिसांना जेव्हा समजलं की, तरूण विहिरीत पडला आहे. तेव्हा पोलिसांनी गावातील लोकांनाही याची सूचना दिली. त्यानंतर लगेच एका दोरी आणि लाकडाची व्यवस्था केली. बऱ्याच मेहनतीनंतर तरूणाला बाहेर काढण्यात आलं. यादरम्यान तरूणाला काही जखमाही झाल्या. बराच वेळ विहिरीत राहिल्याने तो थंडीने कुडकुडतही होता.