तुमच्या पाठीवरही आहेत का डिंपल्स, ठरु शकतात फारच लकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 07:11 PM2022-03-07T19:11:16+5:302022-03-07T19:14:07+5:30
एक गोष्ट आपल्या पाठीच्या खालच्या भागात असते. काही लोकांच्या पाठीच्या खालच्या बाजूला दोन डिंपल तयार होतात (Why dimples formed on lower back), हे तुमच्या कधी लक्षात आलं आहे का?
मानवी शरीर थोडं विचित्र आहे (Weird things about human body). आपल्याला स्वतःच्या शरीराशी संबंधित अशा अनेक गोष्टींबद्दल माहिती नसते, ज्या आपण वर्षानुवर्षे पाहत आलो आहोत. शरीराबद्दलची एक मुख्य गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाचं शरीर सारखं नसतं. प्रत्येकाच्या शरीराची निसर्गाने जन्मापासूनच वेगवेगळी रचना केलेली आहे. अशीच एक गोष्ट आपल्या पाठीच्या खालच्या भागात असते. काही लोकांच्या पाठीच्या खालच्या बाजूला दोन डिंपल तयार होतात (Why dimples formed on lower back), हे तुमच्या कधी लक्षात आलं आहे का?
अनेकांच्या कंबरेवर हे डिंपल्स असतात, ते गालावर असणाऱ्या डिंपलसारखे म्हणजे गालांवर पडते त्या खळीसारखे दिसतात. परंतु कंबरेवर हे डिंपल असण्याचं कारण काय आहे आणि त्याला काय म्हणतात, हे फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला डिंपल्स कंबरेवर का होतात आणि त्याचा अर्थ काय आहे, हे सांगणार आहोत. या डिंपलला डिंपल्स ऑफ व्हीनस किंवा व्हीनस होल (Venus Hole) म्हणतात. रोममध्ये शुक्राला सौंदर्याची देवता मानलं जातं आणि ज्या महिलांना हे डिंपल्स असतात त्यांना सुंदर आणि भाग्यवान मानलं जातं, असं एक कारण या डिंपल्समागे प्रचलित आहे.
व्हीनस होल हे बहुतेक स्त्रियांच्या कंबरेवर असतात, परंतु कधीकधी ते पुरुषांच्या शरीरावरदेखील आढळतात. जिथे पेल्विस आणि पाठीचा कणा एकत्र येतो, त्या ठिकाणी हे डिंपल्स होतात. या ठिकाणी त्वचा आणि पाठीचा कणा जोडलेले असतात. आश्चर्याची एक गोष्ट अशी आहे की कंबरेवर डिंपल व्यायामामुळे येत नाहीत, त्यामुळे तुम्ही ते स्वतःहून निर्माण करू शकत नाही. जर तुमचं वजन कमी (weight loss) झालं तर तुमच्या पाठीचे डिंपल्स सहज दिसू लागतील.
बॅक डिंपलबद्दल आतापर्यंत अनेक अफवा पसरल्या आहेत. ज्यात, बॅक डिंपलमुळे शारीरिक संबंध ठेवताना लोकांना चांगलं वाटतं, ही एक मुख्य अफवा आहे. बॅक डिंपलमुळे व्यक्ती आकर्षक दिसते, हे एक कारण या अफवेमागे असू शकतं. परंतु डिंपल्स आणि शारीरिक संबंध यांचा इतर कोणताही संबंध नाही. शिवाय, ज्यांच्या पाठीवर हे डिंपल्स आहेत ते भाग्यवान असतात, असं म्हटलं जातं. परंतु वरील अफवेप्रमाणेच फक्त डिंपल्समुळे एखादी व्यक्ती भाग्यवान असण्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण किंवा संशोधन नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी निव्वळ अफवा आहेत.