नशीब उजळते ते असे
By admin | Published: May 9, 2017 12:48 AM2017-05-09T00:48:05+5:302017-05-09T00:48:05+5:30
वर्षानुवर्षे बंद असलेल्या घरात दिसतील ती जळमटे, कोळ्यांची जाळी, धूळ, कचरा इत्यादी; परंतु प्रत्येक वेळी असेच असते, असे नाही.
वर्षानुवर्षे बंद असलेल्या घरात दिसतील ती जळमटे, कोळ्यांची जाळी, धूळ, कचरा इत्यादी; परंतु प्रत्येक वेळी असेच असते, असे नाही. एका व्यक्तीला जे सापडले त्यामुळे त्याचे नशीबच उजळले. अमेरिकेतील टेनेसीतील एका घरात चटईखाली वर्षानुवर्षे एक तिजोरी पुरलेली होती. एके दिवशी ती उघडण्यात आली त्यावेळी त्यात खूप महत्त्वाचे व मौल्यवान सामान आढळले. रेडिटवर एका युजरने आपली ही कथा शेअर केली. त्यात त्याने लिहिले की, ‘‘अनेक वर्षांनंतर मी माझ्या आजोबांच्या टेनेसीतील फार्म हाऊसवर गेलो होतो. खूप दिवस ते बंद असल्यामुळे त्याची अवस्था खूपच बिघडलेली होती. मी घराची स्वच्छता सुरू केल्यावर एके ठिकाणी खूपच घाण दिसली. तेथील चौकोन विटा आणि दगडांनी बनवलेला होता. आधी ते काय आहे हे मला समजले नाही; परंतु ते उघडताच तिजोरी दिसली. तिचे कुलूप उघडण्याचा मी खूप प्रयत्न केला; परंतु ते उघडले नाही. कोणीही त्याला उघडू शकले नाही. सात-आठ दिवस तिजोरी उघडली गेली नाही. नंतर मी टीम नावाच्या कुलपे दुरुस्त करणाऱ्यास बोलावले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर तिजोरी उघडली. आधी त्यातील वस्तू या अंधुकशा दिसल्या. त्या बाहेर काढल्यावर मला सुखद धक्काच बसला.’’ आधी त्याने काही नाणी व महत्त्वाचा दस्तावेज काढला. त्यानंतर मौल्यवान सामान काढले. अनेक वस्तू पावसाच्या पाण्यामुळे खराब झाल्या होत्या व काही चांगल्या अवस्थेत होत्या. त्यात जुनी नाणी, चांदीचे दागिने, अलंकार, चांदीचे ताट आदी सामान मिळाले.