50 वर्ष वाट पाहिल्यावर फळफळलं नशीब; रातोरात झाला लखपती, लागली 80 लाखांची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 11:34 AM2023-02-24T11:34:22+5:302023-02-24T11:35:18+5:30

वर्षानुवर्षे लॉटरीचे तिकीट खरेदी करणाऱ्या व्यक्तीने नेहमीप्रमाणे घरी नेल्यानंतर तिकीट स्क्रॅच केले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

luck changed after waiting for 50 years this man became millionaire from lottery | 50 वर्ष वाट पाहिल्यावर फळफळलं नशीब; रातोरात झाला लखपती, लागली 80 लाखांची लॉटरी

50 वर्ष वाट पाहिल्यावर फळफळलं नशीब; रातोरात झाला लखपती, लागली 80 लाखांची लॉटरी

googlenewsNext

कोणाचं नशीब कधी, कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अनेकदा नशीब आजमावणारे लोक लॉटरीत गुंतवणूक करतात, पण नशीब त्यांना साथ देते असे फार क्वचितच घडते. पण असं म्हणतात की नशीब जेव्हा देतं तेव्हा ते भरभरून असतं. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला जो रातोरात लखपती झाला. वर्षानुवर्षे लॉटरीचे तिकीट खरेदी करणाऱ्या या व्यक्तीने नेहमीप्रमाणे घरी नेल्यानंतर तिकीट स्क्रॅच केले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आता तो लखपती झाला होता.

mirror.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, ड्रेसडन नावाचा एक कॅनेडियन व्यक्ती 50 वर्षांपासून लॉटरीचं तिकीट खरेदी करत होता. ओंटारियोमध्ये राहणाऱ्या ड्रेसडनने यावेळी लॉटरीचं तिकीट विकत घेतलं तेव्हा त्याला वाटले की काहीतरी मोठे घडणार आहे. कदाचित प्रत्येक लॉटरी स्क्रॅच करण्यापूर्वी त्यांना अशीच आशा असेल. पण यावेळी त्याचा अंदाज खरा ठरला. 

लॉटरी स्क्रॅच करताच तो लखपती झाला होता. तब्बल 80 लाखांची लॉटरी लागली. दुसर्‍या दिवशी ड्रेसडनचा वाढदिवस होता आणि निसर्गाकडून ते वाढदिवसाचे सरप्राईज होते असं तो म्हणतो. लॉटरी जिंकल्यानंतर ड्रेसडनने सांगितले की, तो आता आपल्या मुलीच्या लग्नासाठी थोडी बचत करून एक महागडा आयफोन खरेदी करेल आणि काही दिवस विश्रांती घेईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: luck changed after waiting for 50 years this man became millionaire from lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.