एका खोलीत बसले होते दोघे, अचानक बॉयफ्रेंडचा फोन वाजला आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 12:31 PM2024-03-06T12:31:48+5:302024-03-06T12:31:56+5:30
एक घटना लखनौमधून समोर आली आहे. ज्यात संशयामुळे प्रेयसीने अचानक प्रियकराचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
प्रेम हे फारच किचकट प्रकरण असतं. हे अनेक घटनांवरून बघायला मिळतं. असं म्हणतात की, जेव्हा एखाद्या नात्यात जास्त प्रेम असतं आणि त्यात जर संशयाची सूई पडली तर ते नातं फार काळ टिकत नाही. अशीच एक घटना लखनौमधून समोर आली आहे. ज्यात संशयामुळे प्रेयसीने अचानक प्रियकराचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
लखनौमधून संशयामुळे घडलेली एक घटना समोर आली आहे. यात संशयामुळे एका कपलमध्ये मोठा वाद झाला. इतका की, प्रेयसी प्रियकराला जीवे मारणार होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसीला संशय आल्यामुळेे तिने आपल्या प्रियकराचं डोकं चिमट्याने फोडलं.
दोघेही निगोहा गावात राहणारे आहेत. रात्री उशीरा प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या बहिणीच्या घरी गेला होता. दोघेही रूममध्ये एकटे होते. तेव्हा अचानक प्रियकराच्या फोनवर एका महिलेचा फोन आला, तो बघून प्रेयसी संतापली. तिने त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिलं आणि त्याच्यावर जेवण बनवताना वापरल्या जाणाऱ्या चिमट्याने वार केला. त्यानंतर तो तिच्या घरातून निघून जातो आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. नंतर पोलिसात जाऊन प्रेयसीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करतो.
प्रियकराने पोलिसांना सांगितलं की, त्याने रविवारीच नवीन फोन खरेदी केला होता. ज्यानंतर प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या बहिणीच्या घरी पोहोचला. प्रेयसीला भेटीदरम्यान अज्ञात महिलेचा फोन आला. ज्यानंतर कशाचाही विचार न करता तिने माझ्यावर चिमट्याने हल्ला केला आणि मोबाइलही घेतला. पोलीस आता पुढील चौकशी करत आहेत.