लक की टॅलेंट! 23 वर्षांची छोकरी, तिला आल्या 23 नोकऱ्या; 22 ठिकाणी दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 03:30 PM2022-06-17T15:30:43+5:302022-06-17T15:31:15+5:30
एवढेच नाही तर तिने भांडी घासण्यापासून ते हॉटेलमध्ये वेट्रेसचे काम देखील केले आहे. महत्वाची बाब म्हणजे तिने एवढे जॉ़ब बदलले परंतू तिला कधीही कामावरून काढून टाकण्यात आले नाही.
एका तरुणीने वयाच्या २३ व्या वर्षीच २३ वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या केल्या आहेत. अशा या प्रतिभावान तरुणीने कधी आईसक्रीम विकलीत तर कधी बेकर म्हणूनही काम केले. आता तिने स्वत:चा उद्योग सुरु केला आहे.
द मिररनुसार या मुलीचे नाव अनास्तासिया (Anastasia Cechetto) आहे. ती लंडनच्या एस इन्फ्लुएन्सर्स नावाच्या मार्केटिंग एजन्सीची सीईओ आणि संस्थापक आहे. ही कंपनी सुरु करण्याआधी तिने २२ वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली आहे. कधी मॉडेल म्हणून, कधी एसईओ तज्ज्ञ तर कधी फिटनेस ट्रेनरम्हणून काम केले आहे.
एवढेच नाही तर तिने भांडी घासण्यापासून ते हॉटेलमध्ये वेट्रेसचे काम देखील केले आहे. महत्वाची बाब म्हणजे तिने एवढे जॉ़ब बदलले परंतू तिला कधीही कामावरून काढून टाकण्यात आले नाही. तिनेच आधीचे काम सोडून दुसरे काम पकडले होते. मात्र, सोशल मीडिया मॅनेजरचा जॉब तिच्या आयुष्य़ात सुर्योदय घेऊन आला.
अनास्तासियानुसार तिची सर्वात मोठी ताकद ही बहुआयामी प्रतिभा आहे. प्रत्येक नोकरीत तीने उत्कृष्ठ काम केले नाही हे देखील ती मान्य करते. परंतू या कामातून ती खूप काही शिकल्याचेही सांगते. सर्व कामातून काहीतरी शिकली आहे. पूर्वी केलेल्या कामाचा फायदा तिला स्वतःच्या व्यवसायात मिळत असल्याचे ती सांगते. इंग्रजी, रशियन, डच आणि इटालियन या चार भाषा बोलणाऱ्या अनास्तासियाने काही काळ अभिनय आणि मॉडेलिंगमध्येही हात आजमावला आहे.