तब्बल ७ कोटींची आहे 'ही' आलिशान हवेली, पण आत जाल तर पोट धरुन हसाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 04:44 PM2021-08-01T16:44:02+5:302021-08-01T16:44:47+5:30
समजा बाहेरुन दिसायला आलिशान असलेले घरं आतून एखाद्या गॅरेजसारखं दिसत असेल तरं, तुम्ही याची किंमत काय द्याल? विचारात पडलात ना? मात्र अशाच वरुन एखाद्या शानदार हवेलीप्रमाणे दिसणाऱ्या पण आतून काहीतरी भलंतच निघालेल्या घराची किंमत आहे ७ करोड रुपये.
तुम्ही घरं विकत घ्यायला गेलात की सर्वप्रथम पाहता ते त्याचे इंटिरियर आणि त्यातील सोयीसुविधा. घर जर मोठं असेल तर ते सोयीसुविधांनी युक्तच असेल अशी खात्री तुम्हाला असते. मग अशा घराची किंमतही तितकीच लावली जाते. पण समजा बाहेरुन दिसायला आलिशान असलेले घरं आतून एखाद्या गॅरेजसारखं दिसत असेल तरं, तुम्ही याची किंमत काय द्याल? विचारात पडलात ना? मात्र अशाच वरुन एखाद्या शानदार हवेलीप्रमाणे दिसणाऱ्या पण आतून काहीतरी भलंतच निघालेल्या घराची किंमत आहे ७ करोड रुपये.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये ही हवेली आहे. ही हवेली १ मिलियिन डॉलरला विकली गेलीय. बाहेरुन तुम्ही या हवेलीचे आलिशान रुप पाहुन हबकाल. पण जेव्हा तुम्ही या हवेलीच्या आत जाल तेव्हा तुमचा पुर्ण हिरमोड होईल. या हवेलीच्या आत गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की बाहेरचा नजरा पूर्णपणे नकली आहे आणि आतमध्ये बेडरुम, किचन तर काय साधा हॉलही नाही. आहे ते एखाद्या चेंबर प्रमाणे लांबच्या लांब गाळा. तरीही त्याची किंमत ७ करोड रुपये का आहे? असा प्रश्न तुम्हाला पडल्यावाचून राहणार नाही.
या घराच्या बाहेर असलेले दरवाजे, खिडक्या आणि तावदान नकली आहेत. फक्त घर बाहेरून शोभिवंत दिसावं म्हणून ती लावण्यात आलेली आहेत. २००० साली बांधण्यात आलेल्या या घरात एक विचित्र गोष्टही आहे. ती म्हणजे या घरात असलेली सेफ्टी ग्लास विंडो. अशी विंडो पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये असते. या घराच्या जाहिरातीत हे घर 'सेफ हाऊस' असल्याचे म्हटले गेलेय. तर आर्ट कलेक्शन, वाईन कलेक्शन आणि गाड्यांचे कलेक्शन ठेवण्यासाठी ही अत्यंत योग्य जागा असल्याचंही म्हटलेलं आहे.