डोंगरांमध्ये बनलं आहे 'हे; रहस्यमय मंदिर, फुलं-हार नाही तर पाण्याची बॉटल वाहतात लोक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 02:05 PM2024-08-03T14:05:04+5:302024-08-03T14:24:20+5:30
रस्त्यात त्याला एक मंदिर दिसलं. डोंगरांमध्ये, पडझड झालेलं हे मंदिर होतं. या मंदिराबाहेर शेकडो पाण्याच्या बॉटल्स पडलेल्या होत्या.
जगभरात अनेक असे रहस्य आहेत ज्यांचा वेळोवेळी खुलासा होत असतो. कधी ही रहस्य धक्कादायक तर कधी आश्चर्यकारक असतात. जगभरात अनेक रहस्यमय मंदिरंही आहेत. असंच एक अजब मंदिर एका व्यक्तीला लडाखमध्ये आढळून आलं. एक व्यक्ती लडाख फिरण्यासाठी आपल्या सायकलने गेली होती. रस्त्यात त्याला हे मंदिर दिसलं. हे मंदिर रस्त्यााच्या कडेला होतं. आश्चर्याची बाब म्हणजे या मंदिरात लोक हार किंवा फुलं नाही तर पाण्याच्या बॉटल वाहतात.
इन्स्टाग्राम यूजर आकर्ष शर्मा @rover_shutterbug एक ट्र्रॅव्हलर आणि कंटेंट किएटर आहे. त्याने लडाखमधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तो सायकलने या भागात फिरत होता. जयपूरहून तो लडाखला सायकलने आला होता. ऑगस्ट २०२३ मध्ये त्याने सांगितलं की, त्याचा हा प्रवास साधारण १ महिन्यांचा होता. रस्त्यात त्याला एक मंदिर दिसलं. डोंगरांमध्ये, पडझड झालेलं हे मंदिर होतं. या मंदिराबाहेर शेकडो पाण्याच्या बॉटल्स पडलेल्या होत्या. पहिल्यांदा पाहिलं असं वाटतं की, कुणीतरी पाणी पिऊन इथे बॉटल्स फेकल्या असतील किंवा कुणी बॉचल्स कचरा म्हणून जमा केल्या असतील. पण असं अजिबात नव्हतं. इथे लोक आपल्या ईच्छेने पाण्याच्या बॉटल ठेवतात. यामागेही एक इंटरेस्टींग बाब आहे.
हे मंदिर एका ट्रक ड्रायव्हरला श्रद्धांजली देण्यासाठी बनवलं होतं. त्याचा मृत्यू १९९९ मध्ये झाला होता. त्याला पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून जे कुणी इथून ये-जा करतात ते इथे पाण्याची बॉटल ठेवतात. आकर्षने इथे पाण्याची बॉटल ठेवली नाही, पण त्याने तेथील दगडावर थोडं पाणी सन्मान म्हणून टाकलं.
आकर्षच्या या व्हिडिओला आतापर्यंत १ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि शेकडो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एका लिहिलं की, 'असं करण्याऐवजी तिथे पाणीची टाकीसारखं काही बनवा जेणेकरून कुणाचाही पाण्याने जीव जाणार नाही'. दुसऱ्याने लिहिलं की, 'हा प्लास्टिकचा कचरा पसरवण्यासारखं आहे. नुसतं पाणी टाकलं तरी चालू शकेल'.