VIDEO : एक असं शाही लग्न ज्यासाठी खर्च झाले 490 कोटी रूपये, सगळं काही होतं स्वप्नवत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 11:23 AM2023-11-28T11:23:53+5:302023-11-28T11:25:13+5:30

Costly wedding of century : भारतातील सगळ्यात महागड्या लग्नाला टक्कर देणारं एक लग्न पॅरिसमध्ये नुकतंच झालं. या लग्नाचा खर्च अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे.

Madelaine Brockway Paris costly wedding of century 490 crores spend | VIDEO : एक असं शाही लग्न ज्यासाठी खर्च झाले 490 कोटी रूपये, सगळं काही होतं स्वप्नवत

VIDEO : एक असं शाही लग्न ज्यासाठी खर्च झाले 490 कोटी रूपये, सगळं काही होतं स्वप्नवत

Costly wedding of century : सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. सगळ्यांना आपलं लग्न शानदार आणि यादगार करायचं असतं. अशात पॅरिसमधील एका अशा लग्नाची चर्चा सुरू आहे ज्याला शतकातील सगळ्यात महागडं लग्न म्हटलं जात आहे. कारण या लग्नासाठी एकूण 490 कोटी रूपये खर्च आला आहे.

लग्नाचा विषय येतो तेव्हा असं वाटतं की, भारतात तर खूप पैसे खर्च करून शाही लग्न करण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. सगळेच आई-वडील आपल्या मुलांच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करतात. पण भारतातील सगळ्यात महागड्या लग्नाला टक्कर देणारं एक लग्न पॅरिसमध्ये नुकतंच झालं. या लग्नाचा खर्च अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे. 26 वर्षीय Madelaine Brockway चं पॅरिसमध्ये झालेल्या या लग्नाला वेडिंग ऑफ द सेंच्युरी म्हटलं जात आहे.

Madelaine Brockway च्या परिवाराचा कार डिलरशीपचा मोठा बिझनेस आहे. मेडलेनने Jacob Lagrone सोबत पॅरिसमध्ये लग्न केलं. लोकांना या लग्नाबाबत समजलं तेव्हापासून लोक हैराण झाले आहेत. दोघांच्या लग्नाचं सेलिब्रेशन जवळपास दोन आठवडे चाललं. लग्नात मडलेनने आणि जॅकबने लक्झरी कपडे घातले होते. इतकंच नाही तर लग्नातील सगळे पाहुणे प्रायव्हेट जेटने आणले गेले होते.

पॅलेस ऑफ वर्सायलमध्ये लग्नाचे सगळे विधी झाले. इतकंच नाही तर या लग्नात हॉलिवूडमधील फेमस बॅंड Maroon 5 यांनाही बोलवण्यात आलं होतं. महाल महागड्या फुलांनी सजवण्यात आला होता. या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

Web Title: Madelaine Brockway Paris costly wedding of century 490 crores spend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.