चुंबकाच्या मदतीने तरूणीने नदीतून काढली तिजोरी, आत जे दिसलं ते पाहून झाला थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 01:47 PM2022-04-23T13:47:34+5:302022-04-23T13:52:16+5:30

'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, १५ वर्षीय जॉर्ज टिंडले ग्रॅथमजवळ विटहॅम नदीत आपले वडील केविनसोबत मासे पकडत होता.

Magnet fisher catches safe containing £1,400 and returns it to owner | चुंबकाच्या मदतीने तरूणीने नदीतून काढली तिजोरी, आत जे दिसलं ते पाहून झाला थक्क

चुंबकाच्या मदतीने तरूणीने नदीतून काढली तिजोरी, आत जे दिसलं ते पाहून झाला थक्क

Next

कधी कधी काही लोकांसोबत असं घडतं की, त्यांना अनोखळ्या ठिकाणी असं काही सापडतं ज्याबाबत त्यांनी कधीही विचार केलेला नसतो. अनेकदा लोकांना धन-दौलत मिळत जे बघून लोक हैराण होतात. असंच काहीसं इंग्लंडच्या एका तरूणासोबत झालं. त्याच्या हाती अशी वस्तू लागली जी बघून तो थक्क झाला. मात्र, त्याने मोठं मन दाखवत ती वस्तू ज्याची होती त्यांना परत केली.

'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, १५ वर्षीय जॉर्ज टिंडले ग्रॅथमजवळ विटहॅम नदीत आपले वडील केविनसोबत मासे पकडत होता. मासे पकडण्यासोबतच तो एक मॅग्नेटिक फिशरही आहे. म्हणजे तो नदीत चुंबक टाकून आतील रहस्यमय वस्तू बाहेर काढतो. काही आठवड्यांपूर्वीही तो असंच करत होता. तेव्हा अचानक त्याच्या चुंबकाला एक तिजोरी चिकटली.

वडील आणि मुलगा दोघेही ही तिजोरी पाहून थक्क झाले. त्यांनी तिजोरी बाहेर काढली आणि ती उघडून पाहिली तर त्यांना धक्काच बसला. त्याचं कारण त्यांना तिजोरीत १.३ लाख रूपयांची ऑस्ट्रेलियन करन्सी सापडली. तिजोरीत त्यांना एक शॉटगनचं सर्टिफिकेट आणि बॅंक कार्ड्सही सापडले जे २०१४ मध्ये एक्सपायर झाले होते. ही तिजोरी रॉब एवरेट नावाच्या व्यापाऱ्याची होती. त्यांना संपर्क केल्यावर सगळं प्रकरण समोर आलं. २००० सालात त्यांच्या ऑफिसमध्ये चोरी झाली होती आणि तेथून तिजोरी गायब झाली होती. जेव्हा तरूण आणि त्याच्या वडिलांना ही तिजोरी सापडली तेव्हा त्यांनी ती लगे परत करण्याचा निर्णय घेतला.

रॉबने जॉर्जचं कौतुक केलं आणि म्हणाला की, विश्वासच बसत नाहीये की, आजच्या काळातही असे इमानदार जगता आहेत. रॉब एक वेल्थ मॅनेजमेंट कंपनी चालवतो. त्यांना जेव्हा समजलं की, जॉर्ज गणितात हुशार आहे तर त्यांनी त्याला इंटर्नशिप किंवा नोकरीची गरज असेल तर त्याच्या कंपनीत नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. 
 

Web Title: Magnet fisher catches safe containing £1,400 and returns it to owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.