११५ वर्षांनी उघडल्या धौलपूरच्या महाराणाच्या बंद खोल्या, सापडलेला 'खजिना' पाहून सगळेच चक्रावले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 01:15 PM2020-03-13T13:15:04+5:302020-03-13T13:26:05+5:30
असे सांगितले जाते की, ज्या शाळेच्या खोल्या भंगार ठेवण्याच्या समजून इतकी वर्ष बंद होत्या त्यातून इतकी मूल्यवान पुस्तके मिळतील याची कुणी कल्पनाही केली नव्हती.
(Image Credit : pinterest.com) (सांकेतिक छायाचित्र)
कबाडखाना समजून ज्या शाळेच्या खोल्यांना ११५ वर्ष उघडलं नाही त्या खोल्या आता उघडण्यात आल्या असून त्यातून एक मोठा 'खजिना' हाती लागला आहे. ११५ वर्षांनी राजस्थानातील धौलपूरच्या महाराणा शाळेतील २ ते ३ खोल्या उघडल्या तेव्हा त्यात अनेक ऐतिहासिक पुस्तकांचा खजिना सापडला.
झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, असे सांगितले जाते की, ज्या शाळेच्या खोल्या भंगार ठेवण्याच्या समजून इतकी वर्ष बंद होत्या त्यातून इतकी मूल्यवान पुस्तके मिळतील याची कुणी कल्पनाही केली नव्हती. या पुस्तकांमुळे इतिहासातील अशी पाने उलगडली जाणार आहेत ज्याचा कुणी विचारही केला नसेल.
धौलपूरच्या महाराणा शाळेतील खोल्या ११५ वर्षांनी उघडण्यात आल्या तेव्हा त्यात १ लाख जुन्या पुस्तकांचा खजिना सापडला. ही पुस्तके लॉक करून ठेवण्यात आली होती. ही सगळी पुस्तके १९०५ आधीची आहेत. असे सांगितले जात आहे की, महाराज उदयभान यांनी दुर्मीळ पुस्तकांची आवड होती. ब्रिटीशकाळात ते लंडन आणि यूरोप दौऱ्यावर जात होते. तेव्हा तिकडून ते ही पुस्तके आणत असत.
या पुस्तकांमधील अनेक पुस्तके अशी आहेत ज्यांवर शाईऐवजी सोन्याच्या पाण्याचा वापर करण्यात आला आहे. १९०५ मध्ये या पुस्तकांची किंमत २६ ते २६ रूपये दरम्यान होती. त्यावेळी सोन्याची किंमत २७ रूपये तोळा होतं. त्यामुळे आता या पुस्तकांची मार्केटमधील किंमत लाखो रूपये सांगितली जात आहे. सर्वच पुस्तके भारत, लंडन आणि यूरोपमधील प्रिंटेड आहेत. त्यात ३ फूट लांब पुस्तकांचाही समावेश आहे. तसेच त्यात अनेक देशांचे नकाशेही आहेत..
(Image Credit : pinterest.com)
११५ वर्षांनी शाळेत वेगवेगळा स्टाफ होता, पण कुणीही या बंद खोल्या उघडण्याचं काम केलं नाही. जेव्हा कबाड साफ करण्यासाठी या खोल्या उघडण्यात आल्या तेव्हा समोर जे दिसलं ते पाहून सगळेच हैराण झाले. कारण तिनही खोल्या पुस्तकांनी भरलेल्या होत्या.
ही पुस्तके इतिहास जाणून घेण्यासाठी, नवीन माहिती मिळवण्यासाठी महत्वाची ठरणार आहेत हे नक्कीच. पण त्यांचं जतनही व्यवस्थित व्हायला पाहिजे. या पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.