कच-यात महाराष्ट्र आघाडीवर!

By Admin | Published: April 6, 2015 03:15 AM2015-04-06T03:15:14+5:302015-04-06T04:54:53+5:30

देशात सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात तयार होतो तर मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण प्रत्येकी ५०० टनाहून जास्त आहे.

Maharashtra tops in Kutch | कच-यात महाराष्ट्र आघाडीवर!

कच-यात महाराष्ट्र आघाडीवर!

googlenewsNext

नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
देशात सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात तयार होतो तर मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण प्रत्येकी ५०० टनाहून जास्त आहे. शहराची कचरापट्टी करण्यात मुंबईकरांनी दिल्लीकरांनाही मागे टाकले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, देशातील सव्वाशे कोटी नागरिक रोज १ लाख ४३ हजार ४४९ टन कचरा करतात. त्यात महाराष्ट्रात तयार होणाऱ्या २६,८२० टन दैनिक कचऱ्याचा वाटा १८ टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी फक्त ४,७०० टन कचऱ्याचीच पद्धतशीर विल्हेवाट लावली जाते, बाकीचा कचरा प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतो.
देशात घनकचरा व्यवस्थापनाची एकूण काय स्थिती आहे याविषयी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेल्या अहवालानुसार उत्तर प्रदेशमध्ये दररोज १९,१८० टन, आंध्र प्रदेश/ तेलंगणमध्ये ११,५०० टन, गुजरातमध्ये ९,२२७ टन, कर्नाटकात ८,७८४ टन तर दिल्लीत ८,३९० टन कचरा तयार होतो.
अहवालानुसार जेथे रोज १०० ते ५०० टन कचरा तयार होतो अशी ७० शहरे आहेत तर ५० ते १०० टन दैनिक कचरानिर्मिती करणाऱ्या शहरांची संख्या ६० आहे.
दररोज ५०० टन किंवा त्याहून अधिक कचरा तयार होणाऱ्या शहरांमध्ये मुंबई, नागपूर, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, सूरत, आग्रा, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ आणि कोलकाता यांचा समावेश होतो.

Web Title: Maharashtra tops in Kutch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.