जगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची यादी जाहीर; भारतातील 'या' फेमस भाजीला मिळाले ६० वे स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 02:58 PM2024-01-04T14:58:01+5:302024-01-04T14:59:43+5:30
भारतात बऱ्याच जणांची आवडणारी ही भाजी सर्वात वाईट खाद्यपदार्थांच्या यादीत जागतिक क्रमवारीत ६० व्या क्रमांकावर आहे.
Top 100 Worst Foods : भारतासारख्या परंपरेने नटलेल्या देशात भाषा, प्रांत रचनेबरोबर तेथील खाद्यपदार्थांमध्येही विविधता आढळते. वेगवेगळ्या प्रदेशातील खास पदार्थ ही त्या विभाागाची ओळख बनली आहे. आपल्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांची चव खवय्यांना चाखायला मिळते. अशा चटकदार, मसालेदार पदार्थांची जगभरात प्रशंसा केली जाते. इथे प्रत्येक पदार्थांची वेगळी खासियत आहे.
परदेशातून भारतात येणारे पर्यटक केवल पर्यटनासाठी नाहीतर भारतात आपल्या जीभेचे चोचले पुरविण्यासाठी देखील येतात. नुकतीच 'टेस्टअटलास' ने जगभरातील सर्वात वाईट नावडते पदार्थ असणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी जाहीर केली आहे.या १०० बॅड रेटेड पदार्थांमध्ये भारतातील वांगे - बटाट्याच्या भाजीला स्थान मिळालंय.
'टेस्टअटलास' या ऑनलाईन फूड डिलिव्हरी पोर्टल द्वारे जगातील सर्वात नावडत्या १०० पदार्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या पदार्थांमध्ये आलु- बैंगन म्हणजेच वांगे -बटाटाच्य़ा भाजने स्थान मिळवलंय. भारतात सर्वाधिक लोकप्रिय असणारी ही भाजी जागतिक क्रमवारीच ६० व्या क्रमांकावर येतेय.
भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असणाऱ्या या भाजीला ५ पैकी २.७ रेटिंग्स मिळाल्या आहेत. मोठ्या चवीने वाग्ंयाचे भरीत, वांग्याची कढी खाणाऱ्यांसाठी ही माहिती अगदीच निराशाजनक आहे.
पाहा यादी -