बापूंच्या 'या' वस्तूंचा कोट्यावधी रूपयांमध्ये झाला लिलाव, प्रयत्न करूनही वाचवू शकला नाही भारत...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 03:24 PM2021-01-30T15:24:30+5:302021-01-30T15:24:53+5:30

इतक्या वर्षानंतरही त्यांच्या विचारांची उपासना केली जाते. याच महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. ते केवळ एक व्यक्ती नव्हते तर एक विचार होते. जे आजही जगातल्या कानाकोपऱ्यात जिवंत आहेत.

Mahatma Gandhi auction personal belongings auction amount in world record | बापूंच्या 'या' वस्तूंचा कोट्यावधी रूपयांमध्ये झाला लिलाव, प्रयत्न करूनही वाचवू शकला नाही भारत...

बापूंच्या 'या' वस्तूंचा कोट्यावधी रूपयांमध्ये झाला लिलाव, प्रयत्न करूनही वाचवू शकला नाही भारत...

Next

जगभरातील लोक महात्मा गांधी यांच्या विचारांची आणि आदर्शांची प्रशंसा करतात. सत्य आणि अहिंसेचे पुजारी बापूंच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो की, इतक्या वर्षानंतरही त्यांच्या विचारांची उपासना केली जाते. याच महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. ते केवळ एक व्यक्ती नव्हते तर एक विचार होते. जे आजही जगातल्या कानाकोपऱ्यात जिवंत आहेत.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अनेक वस्तूंचा ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात आला. भारताने हा लिलाव रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण रोखता आला नाही. बापूंचे रक्ताचे नमूने, शॉल, चप्पल, भाताचा कटोरा, मूत्यूपत्र, आणि पॉवर ऑप अटॉर्नीसारख्या वस्तूंचा लिलाव करून लिलाव करणाऱ्या संस्थेने २ कोटी ५१ लाख ६४ हजार रूपये कमावले होते. त्यानंतर त्यांची टोपी, चरखा, तुळशीची माळ आणि चष्म्याचाही लिलाव करण्यात आला होता. 

गांधीजींचं मृत्यूपत्र

गांधीजींच्या मृत्यूपत्राचा लिलाव ४६,१३,४०० रूपयांनी करण्यात आला होता. हे मृत्यूपत्र ३३ लाखात विकलं जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 

रक्ताचे नमूने

बापूंच्या रक्ताच्या नमून्याला अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे केवळ ५,८७,००० रूपये मिळाले होते. हा नमूना १९२४ मध्ये मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये घेण्यात आला होता. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये बापूंचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. (हे पण वाचा : ३० जानेवारीचा तो दिवस, बापूंवर गोळ्या झाडण्यापूर्वी त्यांना काय म्हणाला होता गोडसे?)

बापूंचं पत्र

बापूंनी १९४३ मध्ये लिहिलेल्या एका पत्राने लिलावात वर्ल रेकॉर्ड केला होता. हे पत्र एका ललाख १५ हजार पौंडला विकलं गेलं होतं.

रक्ताने माखलेली माती आणि गवत

लिलावकर्त्यांनी बापूंच्या हत्येवळी त्यांच्या रक्ताने माखलेली माती आणि तेथील गवताचाही लिलाव केला होता. त्यांची चामड्याची चप्पल लिलावात १९ हजार पौंडला विकली गेली होती. तर त्यांची तुळशीची माळ ९५०० पौंडला विकली गेली होती.

पावर ऑफ अटर्नी

बापूंची पॉवर ऑफ अटर्नी ज्यावर भारतीय बॅंक ऑफ बडौदाची मोहर होती. ही पॉवर ऑफ अटर्नी लिलावात २५ हजार पौंडला विकली गेली होती.

बापूंची सही

बापूंचा एका फोटो ज्यावर त्यांनी सही केली होती. या फोटोला आणि सहीला अपेक्षेपेक्षा जास्त ४० हजार पौंड इतकी किंमत मिळाली होती. तर बापूंची रामायणाची खाजगी प्रत ३५०० पौंडला विकली गेली होती.

चष्मा, घड्याळ, चप्पल, ताट आणि वाटी

भारताच्या लाख हस्तक्षेपानंतरही जेव्हा गांधीजींच्या वस्तूंचा लिलाव थांबला नाही तेव्हा भारतीय उद्योगपती विजय माल्याने लिलावात सहभाग घेऊन काही वस्तू खरेदी केल्या होत्या. त्याने १८ लाख डॉलर देऊन त्यांचा चष्मा, घड्याळ, चप्पल, ताट आणि वाटी खरेदी केली होती.

बापूंचा चरखा

महात्मा गांधी यांच्या प्रिय वस्तूंपैकी एका चरख्याचा लिलाव ब्रिटनमध्ये करण्यात आला होता. या चरख्याचा वापर ते भारत छोडो आंदोलनादरम्यान यरवडा तुरूंगात करत होते. त्यावेळी या चरख्याला १,१०,००० पौंड म्हणजे १,०८७,५७०० इतकी किंमत मिळाली होती.

बापूंचा चष्मा

बापूंच्या चष्म्याचा लिलाव २ कोटी ५५ लाख रूपयात झाला होता.  ब्रिटनच्या ब्रिस्टलमध्ये गाधींजींच्या चष्म्याचा लिलाव करण्यात आला होता. हा चष्मा त्यांना त्यांच्या काकांनी दक्षिण आफ्रिकेत काम करत असताना दिला होता. हा काळ १९१० ते १९३० च्या दरम्यानचा होता.

Web Title: Mahatma Gandhi auction personal belongings auction amount in world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.