Anand Mahindra यांच्या स्कॉर्पिओला मिळालं नवं नाव; ट्वीट करत म्हणाले, “माझा…”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:01 AM2022-10-11T10:01:36+5:302022-10-11T10:03:41+5:30
आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी स्वत:साठी एक नवीन एसयूव्ही खरेदी केली आहे, जी शुक्रवारी त्यांना मिळाली. त्यांनी ट्विटरवर कारच्या चाव्या घेतानाचे छायाचित्र पोस्ट करून त्याच्या स्कॉर्पिओ-एनसाठी नाव विचारले होते.
महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांनी नुकतीच आपल्यासाठी एक नवी कार खरेदी केली. यानंतर त्यांनी त्यांच्या ट्विटरवर नवीन कारची स्कॉर्पिओ एनची चावी घेताना एक फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत त्यांनी नेटकऱ्यांना, गाडीसाठी चांगले नाव सुचवण्याचे आवाहनही केले होती. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांनी आता आपल्या गाडीसाठी एक नाव मिळाल्याचे म्हटले आहे.
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांच्या नवीन स्कॉर्पिओ-एनसाठी अंतिम नाव जाहीर केले. आपल्या कॉर्पिओसाठी नवीन नाव मिळाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये कोणतीही स्पर्धा शिल्लक राहिली नव्हती. भीमच विजेता आहे, माझा लाल भीम, नावं सूचवल्याबद्दल धन्यवाद असे ट्वीट त्यांनी केले आहे.
It was a no-contest…BHEEM it is. My Lal BHEEM…
— anand mahindra (@anandmahindra) October 10, 2022
Thank you for the suggestion..🙏🏽🙏🏽🙏🏽 https://t.co/8eKwmDEv4X
Big day for me; received my ScorpioN…. Need a good name for it…Recommendations welcome! pic.twitter.com/YI730Eo9uh— anand mahindra (@anandmahindra) October 7, 2022
नावसुचवायलासांगितलेहोते
आनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये महिंद्रा लाल रंगाच्या स्कॉर्पिओ एन जवळ हातात पुष्पगुच्छ घेऊन दिसत आहेत. त्यांच्या शेजारी आणखी एक व्यक्ती गाडीची चावी घेऊन उभा आहे. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन दिले की, 'माझ्यासाठी मोठा दिवस आहे. मला Scorpio-N मिळाली. गाडीसाठी चांगले नाव सूचवा.' विशेष म्हणजे, आनंद महिंद्र यांनी काही महिन्यांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्राची नवीन Scorpio-N एसयूव्ही लॉन्च केली आहे. या गाडीची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 23.90 लाख रुपयांपर्यंत जाते. आनंद महिंद्रा यांनी या गाडीचे टॉप व्हेरिअँट खरेदी केले आहे.