जेव्हा शैतान सिंह यांच्या नेतृत्वातील १२४ भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा केला होता खात्मा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 02:23 PM2019-11-19T14:23:24+5:302019-11-19T14:40:44+5:30
१८ नोव्हेंबर १९६२ या दिवशी देशाचे वीर मेजर शैतान सिंह भाटी शहीद झाले होते. शैतान सिंह हे एक लढवय्ये होते की, ज्यांच्या नेतृत्वातील १२० भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा खात्मा केला होता.
(Image Credit : bhaskar.com)
१८ नोव्हेंबर १९६२ या दिवशी देशाचे वीर मेजर शैतान सिंह भाटी शहीद झाले होते. शैतान सिंह हे एक लढवय्ये होते की, ज्यांच्या नेतृत्वातील १२० भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा खात्मा केला होता. आजपासून ५७ वर्षांपूर्वी कंपनी कमांडर शैतान सिंह यांनी रेजांगलामधील युद्धात केवळ लडाखला वाचवले नाही तर चीनला मात देऊन आपलं नाव नेहमीसाठी इतिहासाच्या पानांवर अमर केलं.
लडाखच्या चुशूल घाटीची जबाबदारी १३ कुमाऊंच्या एक तुकडीकडे होती. १२४ जवानांच्या या तुकडीचं नेतृत्व मेजर शैतान सिंह करत होते. शैतान सिंहाकडे जवान कमी होते. पण त्यांच्याकडे ध्येर्य कमी नव्हतं. १८ नोव्हेंबर १९६२ ला लडाखच्या चुशुल घाटीवर बर्फाची चादर पसरलेली होती. सगळीकडे शांतता होती. भारतीय जवान नेहमीप्रमाणे आपापल्या जागी तैनात होते. अशाच अचानक तोफांचा धमाका झाला.
(Image Credit : bhaskar.com)
चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीच्या जवळपास ५ ते ६ हजार जवानांनी हल्ला केला होता. यादरम्यान शैतान सिंह यांनी हुशारी दाखवत आपल्या जवानांना सतर्क केलं. जवान कमी असूनही शैतान सिंह यांनी जीवाची पर्वा न करता चीनी जवानांचा सामना केला. चीनकडून भारतीय जवानांवर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणाच हल्ला चढवला, पण भारतीय जवान डगमगले नाही.
चीनकडून लागोपाठ होत असलेल्या फायरिंगमुळे शैतान सिंह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आपल्या जवानांना प्रोत्साहन देत होते. यादरम्यान शैतान सिंह यांनी जवानांना चीनी सैनिकांवर हलका गोळीबार करण्यास आणि त्यांना गुंतवून ठेवण्यास तसेच त्यांचा गोळा-बारूद संपेपर्यंत वाट बघण्याचा आदेश दिला. जवानांनी तसंच केलं.
(Image Credit : bhaskar.com)
जेव्हा चीनी सैनिकांचा गोळा-बारूद कमी झाला तेव्हा शैतान सिंह यांच्या तुकडीने चीनी जवानांवर जोरदार हल्ला केला. भारतीय जवानांनी आपलं शौर्य दाखवत चीनच्या १३०० चीनी जवानांचा खात्मा केला. पण यादरम्यान ३ कुमाऊं बटालियनच्या ११४ जवानही शहीद झाले. यात शैतान सिंह यांचाही समावेश होता.
(Image Credit : thelallantop.com)
भारतीय सैनिकांसमोर यावेळी केवळ चीनचे मोठ्या प्रमाणातील सैनिक नव्हते, तर भौगोलिक परिस्थिती आणि बर्फाची समस्या देखील होती. तरी सुद्धा भारतीय सैनिकांनी चीनच्या सेनेसोबत दमदार मात दिली. १८ हजार फूट उंच पोस्टवर झालेल्या या युद्धात भारतीय सैनिकांच्या शौर्यासमोर चीनी सैनिकांनी हार मानली होती.
(Image : jagran.com)
लडाखला वाचवण्यासाठी रेजांगला पोस्टवर दाखवलेल्या शौर्यासाठी भारत सरकारने कंपनी कमांडर मेजर शैतान सिंह यांना मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्काने सन्मानित केले. याच बटालियनमधील ८ जवानांना 'वीर चक्र', तर ४ जवानांना 'सेना मेडल' आणि एका जवानाला 'मॅंशन इन डिस्पेच'ने सन्मानित करण्यात आले.