नारी शक्ती! एकाच वेळी तब्बल 4 सिलिंडर उचलते 'ही' महिला कारण...; डोळे पाणावणारी 'ती'ची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 01:12 PM2022-03-04T13:12:20+5:302022-03-04T13:18:49+5:30
एक महिला एकावेळी तब्बल 4 सिलिंडर घेऊन जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
एका गॅस सिलिंडरचं वजन हे जवळपास 30 किलो असतं. हा सिलिंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा म्हटलं म्हटला तरी अनेकांच्या नाकीनऊ येतात. बरीच मेहनत घ्यावी लागते. सध्या सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला एकावेळी तब्बल 4 सिलिंडर घेऊन जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या ही महिला चर्चेचा विषय ठरली आहे. एकाच वेळी चार सिलिंडर नेण्याच्या तिच्या हटके ट्रिकने सर्वच जण हैराण झाले आहेत.
मलेशियाच्या टेरेंगगनूमध्ये राहणारी 30 वर्षांची खैरूनीसा गेल्या तीन वर्षांपासून गॅस सिलिंडर सप्लायरचं काम करते. एकाच वेळी ती एकत्र दोन सिलिंडर जिन्यांवर चढवते आणि उतरवते. तर जमिनीवर ती सहजपणे एकाच वेळी चार सिलिंडर एकत्र खेचू शकते. सिलिंडर उचलतानाचा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती गेल्या महिन्यांपासून हे काम करत आहे. आधी हे काम फक्त पुरुष मंडळी करत होती. पण आता खैरूनीसा अत्यंत कष्टाने हे काम करताना दिसून येत आहे.
एकाच वेळी इतके सिलिंडर उचलायला खैरूनीसा गेल्यावर्षीच शिकली. त्यावेळी कंपनीकडे मनुष्यबळ कमी होतं. आता ती आपल्या या कामात एक्सपर्ट झाली आहे. एका दिवसात ती जवळपास 60 ते 100 गॅस सिलिंडर डिलिव्हर करते. सुरुवातीला सिलिंडर उचलणारी महिला म्हणून लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहायचे. कारण सामान्यपणे हे काम पुरुषांचं आहे, असंच समजलं जातं. त्यामुळे महिलेला सिलिंडर उचलताना पाहून लोकांना विचित्र पाहायचं. पण आता लोकांनाही खैरूनीसाला सिलिंडर उचलताना पाहण्याची सवय झाली आहे.
खैरूनीसाने सांगितलं की पतीच्या निधनानंतर ती आपल्या सासूची काळजी घेते. त्यासाठी मिळेल ती काम ती करते. ट्रक चालवण्यापासून गॅस सिलिंडरही तिला डिलिव्हर करावा लागला. नेहमी ती अशी कामं कुणाच्याही मदतीशिवाय करायची. खैरूसीनाला अशी मेहनत करताना पाहून लोकांनीही तिचं भरभरून कौतुक केलं आहे. काहींनी तिच्यासाठी मदतीचा हातही पुढे केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.