प्रेमासाठी कायपण! बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी नाकारली 2500 कोटी रूपयांची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 11:47 AM2024-01-04T11:47:21+5:302024-01-04T11:47:53+5:30

Angeline Francis: जेलिन एका तरूणाच्या प्रेमात पडली होती आणि याच कारणाने तिने आपल्या वडिलांची प्रॉपर्टी घेण्यास नकार दिला.

Malaysian woman Angeline Francis rejects rs 2500 crore property to marry a common man | प्रेमासाठी कायपण! बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी नाकारली 2500 कोटी रूपयांची संपत्ती

प्रेमासाठी कायपण! बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी नाकारली 2500 कोटी रूपयांची संपत्ती

Angeline Francis:: खऱ्या प्रेमासाठी लोक काहीही करायला तयार होतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मलेशियातील एका अब्जाधीशाच्या मुलीनेही तेच केलं. एंजेलिन फ्रांसिसने प्रेमासाठी असं काही केलं जे वाचून सगळेच हैराण झाले. तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी 300 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 2500 कोटी रूपयांची संपत्ती नाकारली. एंजेलिन एका तरूणाच्या प्रेमात पडली होती आणि याच कारणाने तिने आपल्या वडिलांची प्रॉपर्टी घेण्यास नकार दिला. तिने या पैशांजागी बॉयफ्रेंड निवडला आणि परिवाराची कोट्यावधी रूपयांची संपत्ती सोडली.

एंजेलिन फ्रांसिसचा जन्म बिझनेसमन खू के पेंग आणि माजी मिस मलेशिया पॉलीन चाई यांच्या घरात झाला होता. ऑक्सफोर्डमध्ये शिक्षण घेत असताना ती तिचा बॉयफ्रेंड जेडीया फ्रांसिसला भेटली आणि दोघे प्रेमात पडले. एंजेलिनचे वडील कोरस हॉटेल्सचे मालक आहेत. ते मलेशियातील 44 वे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांना एंजेलिन आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या लग्नाला विरोध होता. अशात एंजेलिनच्या वडिलांनी तिला विचारलं की, तुला प्रेम हवं की परिवाराची संपत्ती? तिला एक निवड करायची होती.

कोणताही विचार न करता आनंदाने तिने प्रेमाची निवड केली. तिने कोट्यावधीची संपत्ती सोडली. नंतर एंजेलिन फ्रांसिसने 2008 मध्ये जेडीया फ्रांसिससोबत लग्न केलं. एंजेलिनचे वडील फार श्रीमंत आहेत आणि त्यानी एंजेलिनला एका श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न करण्यास सांगितलं होतं. पण एंजेलिन एका गरीब तरूणाच्या प्रेमात होती. एजेंलिनने हे सिद्ध केलं की, प्रेमा पुढे काहीही मोठं नाही. 

Web Title: Malaysian woman Angeline Francis rejects rs 2500 crore property to marry a common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.