शारीरिक संबंधावेळी मेल पार्टनरने केलं असं काही, खावी लागू शकते तुरूंगाची हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 10:29 AM2023-03-17T10:29:07+5:302023-03-17T10:29:54+5:30
कोर्ट म्हणालं की, दोषीने आपल्या कृत्याने पीडितेला त्याच्यासोबत असुरक्षित लैंगिक संबंध सहन करण्यासाठी तिला भाग पाडलं. असं करून त्याने तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा घात केला.
शारीरिक संबंध ठेवताना जर सहमतीशिवाय जर एखादं चुकीचं काम केलं गेलं तर त्याला गुन्हा मानला जातो. असं करून तुरूंगवासाची शिक्षाही होऊ शकते. इतकंच नाही तर मोठा दंडही भरावा लागू शकतो. याबाबत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. सध्या नेदरलॅंडमधील अशीच एक घटना चर्चेचा विषय ठरत आहे. नेदरलॅंडमधून पहिल्यांदा सेक्ससंबंधी एका घटना समोर आली आहे.
नेदरलॅंडमध्ये एक व्यक्ती त्याच्या महिला पार्टनरच्या सहमतीशिवाय शारीरिक संबंधादरम्यान लपून कंडोम काढण्याबाबत दोषी ठरला आहे. आरोपीला शारीरिक संबंध ठेवताना पार्टनरच्या सहमतीशिवाय कंडोम काढण्याबाबत मंगळवारी दोषी ठरवण्यात आलं. या व्यक्तीसाठी दिलासादायक बाब ही राहिली की, त्याला कोर्टाने रेपच्या केसमधून निर्दोष सोडलं. कोर्ट म्हणालं की, दोषीवर बलात्काराचा आरोप सिद्ध होत नाही, कारण दोघेही सहमतीने यासाठी तयार झाले होते.
कोर्ट म्हणालं की, दोषीने आपल्या कृत्याने पीडितेला त्याच्यासोबत असुरक्षित लैंगिक संबंध सहन करण्यासाठी तिला भाग पाडलं. असं करून त्याने तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा घात केला आणि त्याने विश्वासाचा दुरूपयोग केला.
मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं की, कोर्टाने हेही म्हटलं की, दोषीने या घटनेनंतर पीडितेला एसएमएस करून माफीही मागितली होती आणि म्हणाला होता की, तू ठीक होशील. अशा घटना याआधीही समोर आल्या आहेत.
जर्मनीमधील एका केसमध्ये बर्लिनच्या एका कोर्टाने 2018 मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला लैंगिक अत्याचाराच्या केसमध्ये दोषी ठरवलं होतं आणि शारीरिक संबंधादरम्यान त्याने लपून कंडोम काढण्यासाठी त्याला 8 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. तसेच आरोपीला पीडितेला 3,100 यूरो भरपाई देण्याचा आदेशही दिला होता.
2021 मध्ये कॅलिफोर्निया "स्टील्थिंग" बेकायदेशीर घोषित करणारं पहिलं राज्य ठरलं होतं. ज्यानंतर इथे सहमतीशिवाय शारीरिक संबंधावेळी कंडोम काढणं बेकायदेशीर झालं.