Good News! २५ वर्षीय महिलेने ९ बाळांना एकत्र दिला जन्म; दोघे तर 'अल्ट्रा साऊंड'मध्ये दिसले नव्हते!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 03:52 PM2021-05-05T15:52:56+5:302021-05-05T15:54:35+5:30

मंगळवारी महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरही हैराण झाले. कारण प्रेग्नन्सीवेळी महिलेच्या गर्भात केवळ सात बाळच डिटेक्ट झाले होते.

Mali woman gives birth to 9 babies doctors could not catch two in ultrasound | Good News! २५ वर्षीय महिलेने ९ बाळांना एकत्र दिला जन्म; दोघे तर 'अल्ट्रा साऊंड'मध्ये दिसले नव्हते!

Good News! २५ वर्षीय महिलेने ९ बाळांना एकत्र दिला जन्म; दोघे तर 'अल्ट्रा साऊंड'मध्ये दिसले नव्हते!

googlenewsNext

पश्चिम आफ्रिकेच्या (West Africa) मालीमध्ये (Mali) एका महिलेने चक्क एकत्र नऊ बाळांना जन्म (Women gives birth to 9 Babies) दिलाय. मंगळवारी महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरही हैराण झाले. कारण प्रेग्नन्सीवेळी महिलेच्या गर्भात केवळ सात बाळच डिटेक्ट झाले होते. २५ वर्षीय हलीमा सिसेच्या डिलीव्हरीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. 

डॉक्टरांनी यावर्षीय मार्चमध्ये सिसेला सांगितले होते की, तिला खूप काळजी घेण्याची गरज आहे. ज्यानंतर ऑथोरिटीज तिला मोरक्कोला घेऊन गेले आणि येथीलच एका हॉस्पिटलमध्ये तिने बाळांना जन्म दिला. मालीच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलेकी, बाळांमध्ये पाच मुली आणि चार मुलं आहेत. डिलीव्हरीनंतर महिलेची तब्येतही चांगली आहे.

प्रेग्नेन्सी दरम्यान मोरक्को आणि मालीमध्ये सिसेचा अल्ट्रासाउंडही करण्यात आला होता. अल्ट्रासाउंड बघितल्यावर डॉक्टरांना केवळ सात बाळच दिसले होते. पण डॉक्टर अल्ट्रासाउंडमध्ये दोन बाळ ट्रॅक करू शकले नाहीत. सर्वच बाळांचा जन्म सिजेरिअन सेक्शनने झाला.

एकत्र एकावेळी नऊ बाळांना जन्म देण्याची ही घटना सामान्य नाही. अशाप्रकारचे मल्टीपल बर्थमध्ये मेडिकल कॉम्प्लीकेशनचा अर्थ हाच होतो की, गर्भात काही बाळ पूर्ण वेळेत पोहोचू शकत नाहीत. गर्भात एकत्र अनेक भ्रूण असण्याला मल्टीपल प्रेग्नन्सी म्हणतात. असं तेव्हा होतं जेव्हा एखादी महिला मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान एकापेक्षा जास्त एग रिलीज करते. प्रत्येक एग स्पर्मने फर्टिलाइज्ड होतं. 

हे फर्टिलाइज्ड एग अनेकदा दोन किंव त्यापेक्षा जास्त भागांमध्ये विभागले जातात. ज्यामुळे मल्टीपल प्रेग्नन्सीची स्थिती निर्माण होते. मल्टीपल डिलीव्हरीमध्ये जन्माला येणार बाळ दिसायला जवळपास सारखेच असतात. पण अनेकदा असंही होतं की, त्यांचा चेहरा एकमेकांसारखा नसतो.

webmd च्या एका रिपोर्टनुसार, जर फर्टिलिटी विंडोदरम्यान एखादी महिला दोन किंवा त्यापेक्षा अधिक एग रिलीज करत असेल प्रत्येक एग वेगवेगळ्या वेळेला फर्टिलाइज होण्याची शक्यता असते. इतकंच काय तर जर महिलेने वेगवेगळ्या पुरूषांसोबत संबंध ठेवले तरी अशी स्थिती निर्माण होते.
 

Read in English

Web Title: Mali woman gives birth to 9 babies doctors could not catch two in ultrasound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.