पैसे देऊन कापून घेतले स्वत:चे पाय, मोठा फ्रॉड करण्याचा केला होता त्याने प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 01:53 PM2024-02-26T13:53:00+5:302024-02-26T13:53:09+5:30

ब्रश हॉग एक गवत कापणारी मशीन आहे. जी ट्रॅक्टरसोबत जुळलेली असते आणि या व्यक्तीने दावा केला आहे की, त्याचे दोन्ही पाय चुकून मशीनमध्ये कापले गेले.

Man allegedly pays someone to cut off his legs for insurance fraud caught | पैसे देऊन कापून घेतले स्वत:चे पाय, मोठा फ्रॉड करण्याचा केला होता त्याने प्लान

पैसे देऊन कापून घेतले स्वत:चे पाय, मोठा फ्रॉड करण्याचा केला होता त्याने प्लान

मिसोरीच्या हॉवेल काउंटी शेरिफ कार्यालयाच्या पालमध्ये एक अजीब घटना समोर आली आहे. या केसमुळे पोलिसही हैराण झाले आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये विलो स्प्रिंग्समधील एका 60 वर्षीय व्यक्तीने कथितपणे ब्रश हॉग दुर्घटनेनंतर आपले दोन्ही पाय गमावले. ब्रश हॉग एक गवत कापणारी मशीन आहे. जी ट्रॅक्टरसोबत जुळलेली असते आणि या व्यक्तीने दावा केला आहे की, त्याचे दोन्ही पाय चुकून मशीनमध्ये कापले गेले.

हॉवेल काउंटी शेरिफ ऑफिसचे लेफ्टिनंट टोरी थॉम्पसन यांनी स्प्रिंगफील्ड न्यूज रीडरला सांगितलं की, जर हे एखाद्या जंगली जनावराकडून करण्यात आलं असतं, तर घाव वेगळे दिसले असते. मी आधीही ट्रॅक्टरच्या अशा घटना पाहिल्या आहेत. हे तशी नाहीये.

अपघाताच्या ठिकाणी पोहोचलेल्या अधिकारी आणि डॉक्टरांनी पायांच्या स्टंपवर लागलेल्या टूर्निकेटबाबत फार संशय आला. ते विचार करत होते की, अपघाताच्या लगेच नंतर ते कसे लावण्यात आले. जसजशी चौकशी पुढे गेली व्यक्तीची कहाणी अजून गडबड वाटली. शेवटी पोलिसांना समजलं की, फ्लोरिडामधील एक व्यक्ती कुऱ्हाड घेऊन पीडित व्यक्तीजवळ पोहोचली होती आणि कथितपणे पैसे घेऊन त्याने त्याचे पाय कापले होते.

करायची होती मोठी फसवणूक

आता प्रश्न हा आहे की, कुणी पैसे देऊन पाय कोण कापून घेईल? नंतर तेव्हा असं समजलं की, 60 वर्षीय पॅराप्लेजिक व्यक्तीने विम्यामध्ये फसवणूक करण्यासाठी त्याचेच पाय कापून घेतले होते. तो आधीच पॅरालाइज्ड असल्याने त्याचे पाय कोणत्याही कामाचे नव्हते. त्यामुळे त्याने प्लान करून पाय कापण्याचा निर्णय घेतला. पण विमा कंपनीची फसवणूक करण्याआधीच तो पकडला गेला. 

थॉम्पसन म्हणाला की, ही एक फार चुकीची प्लानिंग होती. मी असं आधी कधी पाहिलं नव्हतं. भलेही पॅरालिसिस गेलेल्या व्यक्तीवर विमा कंपनीसोबत फसवणूक करण्याचा आरोप लावला जाऊ शकला नाही, तरीही शेरिफ कार्यालय आणि इतरांचा वेळ घालवल्यामुळे त्याच्यावर दबावाचा आरोप करण्याचा विचार करण्यात आला.

समस्या ही होती की, या व्यक्तीच्या जखमा इतक्या गंभीर होत्या की, त्याला अटक करणंही शक्य नव्हतं. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 

Web Title: Man allegedly pays someone to cut off his legs for insurance fraud caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.