निर्दोष असूनही २३ वर्षांपर्यंत तुरूंगात रहावं लागलं, आता मिळणार ३.६ कोटी नुकसान भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 03:54 PM2021-03-04T15:54:48+5:302021-03-04T15:57:52+5:30
कर्टिस फ्लॉवर्सला जानेवारी १९९७ मध्ये अटक करण्यात आली होती. कर्टिसवर आरोप होता की, त्याने अमेरिकेतील शहर वीनोनामध्ये चार लोकांची हत्या केली.
अमेरिकेतील एका व्यक्तीला निर्दोष असूनही २३ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती. अखेर या व्यक्तीला आता न्याय मिळाला आहे. कोर्टाने सांगितलं की, या प्रकरणी या व्यक्तीला नुकसान भरपाई म्हणून ५००,००० डॉलर म्हणजेच ३.६ कोटी रूपये दिले जावेत. कर्टिस फ्लॉवर्सला जानेवारी १९९७ मध्ये अटक करण्यात आली होती. कर्टिसवर आरोप होता की, त्याने अमेरिकेतील शहर वीनोनामध्ये चार लोकांची हत्या केली.
ही घटना एका फर्नीचर स्टोरमध्ये घडली होती. तेव्हापासून कर्टिस तुरूंगात होता आणि त्याला डिसेंबर २०१९ मध्ये सोडण्यात आले. मिसिसीपीचे न्यायाधीस जॉर्ज मिचेल यांनी सरकारला आदेश दिले आहे की, या व्यक्तीला दहा वर्षांपर्यंत ५०-५० हजार डॉलर दिले जावे. त्यासोबतच असेही सांगितले की, एटॉर्नीच्या फीसाठी ५० हजार डॉलर वेगळे दिले जावे.
फ्लावर्सवर आरोप होता की, त्याने ५९ वर्षीय बार्था टार्डी, ४२ वर्षीय रॉबर्ट गोल्डन, ४५ वर्षीय कार्मेन रिग्बी आणि १६ वर्षीय डेरेक स्टीवर्टची हत्या केली. फ्लावर्स दोन आठवड्यांपूर्वी याच स्टोरमध्ये काम करण्यासाठी आला होता. फ्लावर्सच्या केसमध्ये बेजबाबदारपणाची गोष्ट समोर आली होती. त्याला आरोप सिद्ध न होता अनेक वर्ष तुरूंगात रहावं लागलं.
अमेरिकन पब्लिक मीडिया रिपोर्ट्ससोबत बोलताना फ्लावर्स म्हणाला की, मला चांगलं वाटत आहे. मला वाटतं ही रक्कम आणखी जास्त असायला हवी होती. पण मला चांगलं वाटत आहे. याप्रकरणी फ्लावर्सच्या वकिलांनी न्यूज आउटलेटसोबत बोलताना सांगितले की, या केसबाबत जास्तीत जास्त माहिती मिळवल्यावर हे स्पष्ट होतं की, फ्लावर्सने कोणताही गुन्हा केलेला नाही.
ते पुढे म्हणाले की, त्याला दोन दशकांपेक्षा जास्त काळ तुरूंगात रहावं लागलं. याची नुकसान भरपाई त्याला मिळणारच होती. त्याचे हैराण करण्यासारखं काहीच नाही. तिच पूर्ण आयुष्य ज्याप्रकारे उद्ध्वस्त करण्यात आलं त्यानुसार ५०० हजार डॉलर्स जास्त नाहीत. पण दुर्दैवाने या कायद्यानुसार इतकीच रक्कम दिली जाऊ शकते.