3 पत्नींमुळे तुरूंगात गेला, पहिल्या पत्नीने केली त्याची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 01:41 PM2023-02-11T13:41:38+5:302023-02-11T13:42:01+5:30
आतापर्यंत त्याच्या तीन पत्नी सापडल्या आहेत. इतर पत्नींचा शोध सुरू आहे. व्यक्तीवर Bigamy Relationship मध्ये राहण्याचा आरोप आहे. ऑस्ट्रेलियामध्ये Bigamy बेकायदेशीर आहे.
एका व्यक्तीने लपून एकापेक्षा जास्त लग्ने केली. जेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा त्याच्यावर कारवाई करण्यात आली. नुकतीच पोलिसांनी त्याला अटक केली. आतापर्यंत त्याच्या तीन पत्नी सापडल्या आहेत. इतर पत्नींचा शोध सुरू आहे. व्यक्तीवर Bigamy Relationship मध्ये राहण्याचा आरोप आहे. ऑस्ट्रेलियामध्ये Bigamy बेकायदेशीर आहे.
द मिररच्या रिपोर्टनुसार, पर्थमध्ये राहणारा 48 वर्षीय व्यक्तीवर आरोप आहे की, त्याने पहिली पत्नी असताना दोन अजून लग्ने केली. त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला नव्हता. खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्याने वेगवेगळ्या महिलांसोबत लग्न केलं. पण पहिल्या पत्नीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पतीच्या दुसऱ्या पत्नीला संपर्क करून पतीच्या कृत्याचा पर्दाफाश केला.
पहिल्या पत्नीसोबत राहत असताना व्यक्ती जुलै 2020 मध्ये आणखी एका महिलेसोबत लग्न केलं. नंतर काही महिन्यांनी त्याने तिसरं लग्न केलं. हे ना त्याने पहिल्या पत्नीला सांगितलं ना दुसऱ्या पत्नीला. रजिस्ट्रार ऑफिसमध्ये खोटं बोलून आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे तिसरं लग्नही रजिस्टर केलं.
असं सांगण्यात आलं की, व्यक्ती एका चौथ्या महिलेच्याही संपर्कात होता आणि तिच्यासोबतही लग्न करण्याच्या तयारीत होता. पण त्याआधीच ऑस्ट्रेलियन पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशी दरम्यान त्याने त्याला एक पत्नी असल्याचं सांगितलं. पण जेव्हा खोलात चौकशी करण्यात आली तेव्हा समजलं की, त्याने अनेक लग्ने केली आहेत. सध्या पोलीस चौकशी करत आहेत. कारण तो पुन्हा पुन्हा त्याचा जबाब बदलत आहे.
ऑस्ट्रेलियन कायद्यानुसार, कोणतीही व्यक्ती पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय दुसरं लग्न करू शकत नाही. दोन लग्न करणं बेकायदेशीर आहे. यासाठी कमीत कमी 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते.