'या' व्यक्तीने तब्बल १ वर्ष खाल्लेत डेट एक्सपायर झालेले पदार्थ, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 04:56 PM2019-07-01T16:56:49+5:302019-07-01T17:02:21+5:30

रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्या किंवा घरात ठेवलेल्या अनेक पदार्थांची डेट एक्सपायर झालेली असते. असे पदार्थ किंवा वस्तू सामान्यपणे लोक फेकून देतात.

Man ate expired food for more than a year to prove expiration dates have little to do with safety | 'या' व्यक्तीने तब्बल १ वर्ष खाल्लेत डेट एक्सपायर झालेले पदार्थ, पण का?

'या' व्यक्तीने तब्बल १ वर्ष खाल्लेत डेट एक्सपायर झालेले पदार्थ, पण का?

Next

रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्या किंवा घरात ठेवलेल्या अनेक पदार्थांची डेट एक्सपायर झालेली असते. असे पदार्थ किंवा वस्तू सामान्यपणे लोक फेकून देतात. पण एका व्यक्तीने यावर एक एक्सपरिमेंट केलं. या व्यक्तीने एक वर्ष केवळ आणि केवळ डेट एक्सपायर झालेले प्रॉडक्ट्स खाल्लेत. आणि आता ते याने काय फरक पडला हे सांगत आहेत. 

कशी सुचली ही आयडिया

स्कॉट नॅश यांना ही आयडिया अचानक नाही आली. तीन वर्षांआधी ते एका ट्रिपवर गेले होते. अनेक महिन्यांनी घरी परतले. भूक लागली म्हणून त्यांनी घरात पडून असलेलं एक योगर्ट खाल्लं. सहा महिन्यांपूर्वीच याची डेट एक्सपायर झाली होती. पण तरीही स्कॉटने ते खाल्लं. स्कॉट हे एका पर्यावरणवादी आणि MOM ऑर्गॅनिक मार्केटचे मालक आहेत. ही एक ग्रोसरी स्टोरची चेन आहे. 

पॅकेटवरील तारखेने होतात सगळे कन्फ्यूज

स्कॉट सांगतात की, योगर्ट टेस्ट खराब झाली नव्हती. तसेच ते खाल्ल्यावर त्यांना आरोग्यासंबंधी कोणती समस्याही झाली नाही. बस यानंतर त्यांनी एक एक्सपरिमेंट करण्याचा विचार केला. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं की, 'एक्सपायरचा अर्थ काय होतो? प्रॉडक्टवर लिहिलेलं असतं, 'बेस्ट बाय', 'सेल बाय', 'बेस्ट इफ यूज्ड बाय'. मला फक्त हे जाणून घ्यायचं होतं की, हे सगळं इतकं कन्फ्यूजिंग का असतं'. ते पुढे लिहितात की, फूड प्रॉडक्ट डेटिंग सिस्टीममध्ये सुधारणेची गरज आहे. यात थोडी स्पष्टता असायला हवी. अनेक खाद्य पदार्थांवर अशाप्रकारची तारीख लिहिण्याची गरज नसते.

स्कॉटच्या परिवारानेही खाल्लं हे पदार्थ

एक वर्षांपेक्षा अधिक काळ स्कॉट आणि त्यांच्या परिवाराने दररोज डेट एक्सपायर झालेले पदार्थ खाल्ले. यात ७ ते ८ महिन्याआधी एक्सपायर झालेलं योगर्ट, दोन-तीन आठवड्यांपूर्वीचं मांस यांचा समावेश होता. त्यांनी अनेक महिन्यांपासून फ्रिजमध्ये ठेवलेलं बटरही खाल्लं. सगळंकाही ठिक होतं.

काही प्रॉडक्ट खरंच खराब झाले होते

स्कॉट यांनी हेही सांगितले की, अनेक फूड प्रॉडक्ट्स खरंच खराब झालेले होते. जे फेकावे लागले. ते म्हणाले की, 'माझं म्हणणं इतकंच आहे की, कंपन्यांकडून अशी एखादी तारीख दिली जात असल्याने लोक 'कंज्यूमर एंजायटी डिसॉर्डर'चे शिकार होतात. या तणावात लोक असेही पदार्थ फेकतात जे खाल्ले जाऊ शकतात. मुळात अनेक पदार्थ 'बेस्ट बिफोर' तारखेनंतरही चांगले राहतात'.

एक्सपायरी डेटबाबत कायदा

एफडीए, अभ्यासक आणि किराणा निर्माण उद्योगाशी संबंधित लोकही याबाबत सहमत आहेत की, क्लिअर पॅकेज-डेट लेबलिंगने फूड प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणात फेकण्यापासून वाचतील. पण वर्तमानात एक्सपायरी डेटबाबत कोणताही ठोस कायदा नाहीय. त्यामुळे निर्माते त्यांना हवं ते लेबल प्रॉडक्टवर लावू शकतात.

Web Title: Man ate expired food for more than a year to prove expiration dates have little to do with safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.