गेल्या ७ महिन्यांपासून कोमात होता हा तरूण; शुद्धीवर येताच पोलिसांनी केली अटक, कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 12:07 PM2021-01-23T12:07:55+5:302021-01-23T12:08:41+5:30
दक्षिण सीडनीमध्ये राहणारा हा तरूण गेल्यावर्षी जूनमध्ये त्याच्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली पडला होता.
ऑस्ट्रेलियामध्ये एक २१ वर्षीय व्यक्ती ७ महिन्यांनंतर कोमातून बाहेर आला. पण जसाही तो कोमातून बाहेर आला त्याला पोलिसांनी अटक केली. या तरूणावर आपल्या गर्लफ्रन्डला मारण्याचा आरोप आहे. तो स्वत: त्याच रात्री चौथ्या फ्लोरवरून खाली पडला होता. गेल्या सात महिन्यांपासून हा तरूण कोमात होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते.
दक्षिण सीडनीमध्ये राहणारा हा तरूण गेल्यावर्षी जूनमध्ये त्याच्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली पडला होता. त्याच्या डोक्यावर गंभीर जखम झाली होता आणि सात महिन्यांपासून तो कोमात होता. जेव्हा पोलीस दुसऱ्या दिवशी याच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना एका १९ वर्षीय तरूणीचाही मृतदेह आढळून आला. पोलिसांचा आरोप आहे की, या महिलेला मारझोड करून तिची हत्या करण्यात आली.
मात्र हे स्पष्ट होऊ शकलं नाही की, त्याने स्वत:हून खाली उडी मारली की तो चुकून खाली पडला. या प्रकरणाबाबत डिटेक्टिव इन्स्पेक्टर रॉबर्ट एलिसन म्हणाले की, काही साक्षीदारांनी सांगितलं की, तो चौथ्या फ्लोरवरून कॉमन एरियातून खाली पडला होता. याचा अर्थ हा होतो की, एकतर तो काहीतरी कर्तब करत असेल किंवा त्याने सुसाइड करण्याचा प्रयत्न केला.
एलिसन म्हणाला की, हा तरूण फार नशीबवान आहे की तो वाचला. कारण इतक्या उंचावरून खाली पडल्यावर वाचणं शक्य नव्हतं. रिपोर्ट्सनुसार, मृत मुलीच्या घरचे लोक खूप धक्क्यात आहेत. कारण ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना गाइडलाइन्समुळे या मुलीचा परिवार तिच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ शकला नाही.
दरम्यान दोघेही चीनचे राहणारे आहेत आणि गेल्या दोन वर्षांपासून सोबत आहेत. दोघेही स्टुडंट व्हिसावर ऑस्ट्रेलियात शिकायला आले होते. या तरूणाचा जामीन फेटाळण्यात आला आहे. तो व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून कोर्टात हजर होईल. तेच एलिसन म्हणाले की, मुलीच्या परिवाराला शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.