ठाय ठाय! महिलांच्या सुरक्षेसाठी आली खास Lipstick Gun, पण ही 'गन' काम कशी करते?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 03:47 PM2020-01-09T15:47:35+5:302020-01-09T15:56:58+5:30

महिलांवरील वाढते अत्याचार पाहता महिला स्वत:कडे सुरक्षेसाठी स्प्रे इत्यादी वस्तू ठेवू लागल्या आहेत.

Man from banaras develops security gadget for women a lipstick gun with bullet sound and 112 call facility | ठाय ठाय! महिलांच्या सुरक्षेसाठी आली खास Lipstick Gun, पण ही 'गन' काम कशी करते?

ठाय ठाय! महिलांच्या सुरक्षेसाठी आली खास Lipstick Gun, पण ही 'गन' काम कशी करते?

Next

महिलांवरील वाढते अत्याचार पाहता महिला स्वत:कडे सुरक्षेसाठी स्प्रे इत्यादी वस्तू ठेवू लागल्या आहेत. अशात आता बनारसमधील श्याम चौरसिया नावाच्या व्यक्तीने एक कमाल वस्तू तयार केली आहे. त्यांनी महिलांसाठी एक 'लिपस्टिक गन' तयार केली आहे. ही 'गन' लिपस्टिकसारखीच दिसते, मात्र रोडरोमिओंना धडा शिकवण्यासाठी सक्षम आहे. ही 'गन' महिला रोडरोमिओंना घाबरवण्यासाठी आणि मदत मागवण्यासाठी आहे.

या खासप्रकारच्या लिपस्टिक गनची खासियत म्हणजे समस्येवेळी महिला लिपस्टिक गनचं बटन दाबतील तेव्हा बंदुकीची गोळी चालवल्यासारखा मोठा आवाज होईल. त्यांच्यानुसार, हा आवाज एक किलोमीटरपर्यंत ऐकला जाऊ शकतो. हा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक मदतीसाठी जाऊ शकतील.

लिपस्टिक गनचं बटन दाबताच ११२(हेल्पलाइन नंबर) वर कॉल जाईल. सोबतच महिलेचं लाइव्ह लोकेशनही पोलिसांपर्यंत आणि परिवारातील लोकांपर्यंत जाईल. असं झाल्यास महिलेकडे वेळेच मदत पोहोचू शकेल.

श्याम चौरसिया यांनी सांगितले की, आम्हाला ही लिपस्टिक गन तयार करण्यासाठी साधारण महिनाभराचा कालावधी लागतो. तर हे डिवाइस तयार करण्यासाठी ५०० ते ६०० रूपये खर्च येतो. त्यांचा उद्देश हाच आहे की, हे डिवाइस जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावं, ज्याने त्या आत्मरक्षा करू शकतील.


Web Title: Man from banaras develops security gadget for women a lipstick gun with bullet sound and 112 call facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.