अरे व्वा! खोदकाम करताना दुसऱ्यांदा नशिब चमकलं; सापडलं असं काही, किंमत वाचून अवाक् व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 05:19 PM2020-08-05T17:19:49+5:302020-08-05T17:24:32+5:30
काही महिन्यांपूर्वी या व्यक्तीच्या हाती असाच एक दगड लागला होता.
खोदकाम करत असताना एका गृहस्थाला लॉटरी लागण्याची घटना समोर येत आहे. खोदकाम करत असताना गृहस्थाला अनोखा दगड सापडला. तुमचा विश्वास बसणार नाही पण हाच दगड विकून या गृहस्थाने तब्बल १४.७ कोटी रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी या व्यक्तीच्या हाती असाच एक दगड लागला होता. तो दगड विकून या गृहस्थाने २३.५ कोटी रुपये मिळवले होते.
डेलीमेलने दिलेल्या माहितीनुसार दोनवेळा कोट्यावधी रुपये कमावणाऱ्या गृहस्थाचं नाव सॅनिनिऊ लॅजेर आहे. सॅनिनिऊ लॅजेर हा टांझानियाचा रहिवासी आहे. त्याठिकाणच्या खाणीत खोदकाम करण्याचं काम सॅनिनिऊ करतो. टांझानिया हा देश केनिया आणि झिंबाम्वेजवळ स्थित आहे.
या माणसाचे वय ५० असून त्यांना तब्बल ३० मुलं आहेत. सॅनिनिऊ लॅजेरला यांना मिळालेल्या दगडाचं वजन ६.३ किलो होतं. सोमवारी एका खास समारंभात हा दगड त्यांनी १४.७ कोटींना विकला. शेकडो लोकांच्या उपस्थित हा समारंभ पार पडला. सॅनिनिऊ यांना एकूण तीन लग्न झाली असून तीस मुलं आहेत.
या रकमेतून शाळा आणि शॉपिंग मॉल्स तयार करण्याच्या विचारात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, इतके पैसे मिळाल्यानंतरही आपलं राहणीमान बदलणार नाही. २००० गाईंची देखभाल करण्याचे काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सॅनिनिऊ यांना सापडलेला दगड खूप दुर्मिळ आहे. या दगडाला Gemstone असं म्हणतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमीपूजन करत असताना दालनाजवळ २ बकऱ्या पोहोचल्या, तेव्हा...
राम मंदिरासाठी ८८ वर्षीय आजींचा २८ वर्षांचा अन्नत्याग! भूमिपूजनाच्या दिवशी व्रत सोडणार