पैसाच पैसा! गाड्यांच्या नंबर प्लेट खरेदी करुन 'तो' झाला करोडपती; 'असं' फळफळलं नशीब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 10:57 AM2023-08-29T10:57:26+5:302023-08-29T11:03:10+5:30
नंबर प्लेटने काहीतरी वेगळे करण्याचा मार्ग दाखवला होता आणि तो आता करोडपती बनून फिरत आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
माणसाचे नशीब त्याला कधी आणि कुठे नेईल, काही सांगता येत नाही असं म्हणतात. अनेकवेळा असं काहीतरी घडतं की एखादं काम करताना आपल्याला समजत नाही की त्यामुळे आपल्यासाठी कोणत्या संधी समोर आल्या आहेत. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं आहे, ज्याला नंबर प्लेटने काहीतरी वेगळे करण्याचा मार्ग दाखवला होता आणि तो आता करोडपती बनून फिरत आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
मिररच्या रिपोर्टनुसार, बर्मिंगहॅममध्ये राहणारा रोड शील्ड नावाचा व्यक्ती कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीने श्रीमंत झाला नाही, तर वाहनांच्या नंबर प्लेट्सची खरेदी-विक्री करून तो एक दिवस करोडपती झाला. ही प्रक्रिया 1980 मध्ये सुरू झाली, जेव्हा त्याने वाहनाची नंबर प्लेट खरेदी केली. जवळपास वर्षभरानंतर त्याने तीच नंबर प्लेट विकली तेव्हा त्याची किंमत कितीतरी पटीने जास्त होती. येथूनच त्याला श्रीमंत होण्याचा मार्ग कळला.
वाहनांच्या नंबर प्लेटने केलं करोडपती
रोड शील्ड्स हा बर्मिंगहॅम, यूकेचे रहिवासी आहेत आणि त्याने 1980 मध्ये £120 म्हणजेच सुमारे 12 हजार रुपयांना एक नंबर प्लेट खरेदी केली होती, ज्यावर एक नंबर आणि 3 अक्षरे लिहिलेली होती. रोडने ते वर्तमानपत्रात जाहिरातीसाठी टाकलं आणि दुसऱ्याच दिवशी ती प्लेट £3,000 म्हणजेच 3 लाख 11 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकली गेली. यानंतर रोडने मागे वळून पाहिलं नाही, प्रॉपक्टी डील सुरू केलं आणि लवकरच तो करोडपती झाला. हे सर्व केवळ नंबर प्लेटमुळे घडल्याचे तो सांगतो.
रोड म्हणतो की, तो प्रॉपर्टी आणि वाहनांच्या नंबर प्लेटवरील व्यवहारांसाठी नेहमी वर्तमानपत्रातील क्लासिफाईड सेक्शन वापरतो. त्याने वयाच्या 16 व्या वर्षी एवढी कमाई केली होती की त्याला घर घ्यायचं होतं पण 18 वर्षांचा होईपर्यंत वाट पाहावी लागली. तोपर्यंत घराचे दर वाढले होते. तो कस्टमाइज नंबर प्लेट देखील बनवतो आणि यामुळे त्याला भरपूर पैसे मिळतात. तो खूप क्रिएटिव्ह आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.