अरे देवा! 1400 किमी दूर असलेल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी पायी प्रवास; म्हणाला, व्हॅलेंटाईन डेला...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 03:31 PM2023-01-22T15:31:02+5:302023-01-22T15:32:42+5:30
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी 1400 किलोमीटरचा प्रवास करत आहे.
सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने दावा केला आहे की, तो व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी 1400 किलोमीटरचा प्रवास करत आहे. 5 महिन्यांपूर्वीच तो तिला टिकटॉकवर भेटला होता. 14 जानेवारीपासून त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. तो सतत आपल्या प्रवासाचे अपडेट्स लोकांशी शेअर करत असतो.
Thaiger च्या रिपोर्टनुसार, ही व्यक्ती थायलंडची रहिवासी आहे. नाखोन नायक प्रांतातील आपल्या घरातून तो सतुन प्रांतात जाणार आहे. त्याची मैत्रीण इथे राहते. ते अद्याप भेटले नसले तरी ते व्हिडिओ कॉलिंगवर बोलत आहेत. व्यक्तीने सांगितले की तो 14-15 फेब्रुवारीपर्यंत त्याच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तो सुमारे 1,400 किमीचा प्रवास करणार आहे. मैत्रिणीने त्याला सातुनपर्यंत चालण्याचे किंवा धावण्याचे आव्हान दिले. प्रेम सिद्ध करण्यासाठी तो हे करत आहे.
टिकटॉक (@kaocivid1970) वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला- पाच महिन्यांपूर्वी मी तिला टिकटॉकवर भेटलो. आम्ही प्रत्यक्ष आयुष्यात कधीच भेटलो नाही पण व्हिडिओ कॉलद्वारे नियमितपणे बोलतो. अलीकडेच माझ्या मैत्रिणीने मला आव्हान दिले की सातून पर्यंत चालत किंवा धावत ये आणि प्रेम सिद्ध कर. मी हे आव्हान स्वीकारले आणि तिच्या घराकडे निघालो.
प्रवास सुरू करण्यापूर्वी, तो माणूस दुसर्या व्हिडिओमध्ये म्हणाला - खरे प्रेम अस्तित्त्वात आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी मी धावणार आहे. मी एक महिना धावेल. 14 जानेवारीपासून केलेली सुरुवात14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला तिकडे पोहोचेल. सोशल मीडियावर खरे प्रेम मिळू शकते हे मी सिद्ध करेन. थायलंडच्या सोशल मीडियावर याची चर्चा होत आहे. प्रेमात पडलेल्या या व्यक्तीच्या सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याने त्याच्या प्रवासाची चांगली तयारी केली होती. तो सोबत जॅकेट, टोपी, सनग्लासेस आणि घेऊन जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"