अरे देवा! रागाच्या भरात दाताने अजगराचं शिर धडापासून वेगळं केलं, पत्नीसोबत झालं होतं भांडण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 01:22 PM2023-02-04T13:22:42+5:302023-02-04T13:22:56+5:30

हैराण करणारी ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडामधील आहे. पोलिसांनी 32 वर्षीय तरूणाला अटक केली आहे. त्याच्यावर आरोप आहे की, कौटुंबिक वादामुळे त्याने एका प्राण्याचा जीव घेतला.

Man bites off pet python head by his teeth beheaded snake during fight with wife | अरे देवा! रागाच्या भरात दाताने अजगराचं शिर धडापासून वेगळं केलं, पत्नीसोबत झालं होतं भांडण...

अरे देवा! रागाच्या भरात दाताने अजगराचं शिर धडापासून वेगळं केलं, पत्नीसोबत झालं होतं भांडण...

Next

जास्तीत जास्त लोक सापाजवळ जाण्यासही घाबरतात. काही लोक तर दुरूनही सापाला बघत नाहीत. पण अमेरिकेत एका व्यक्तीने एका अजगराचे आपल्या दाताने तुकडे केले. त्याने इतका जोरदार चावा घेतला की, अजगराचं मुंडकं धडापासून वेगळं केलं. तुम्ही वाचून अवाक् व्हाल की, काही वेळाआधीच या व्यक्तीचं एका महिलेसोबत भांडण झालं होतं. ज्यामुळे तो चांगलाच संतापलेला होता.

हैराण करणारी ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडामधील आहे. पोलिसांनी 32 वर्षीय तरूणाला अटक केली आहे. त्याच्यावर आरोप आहे की, कौटुंबिक वादामुळे त्याने एका प्राण्याचा जीव घेतला. न्‍यूयॉर्क पोस्‍टच्या रिपोर्टनुसार, सकाळी साधारण 5.30 वाजता पोलिसांना कुणीतरी फोन करून सांगितलं की, एका अपार्टमेंटमध्ये पती-पत्नी भांडत आहेत. अनेक तासांपासून त्यांचं भांडण होत आहे. यामुळे शेजारी वैतागले आहेत.

पोलीस जेव्हा पोहोचले तेव्हा अपार्टमेंटच्या बाहेर एका अजगराचं शिर त्याच्या धडापासून वेगळं असलेलं दिसलं. जे बघून पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी दरवाजा उघडण्यास सांगितलं तेव्हा दोघांनीही उघडला नाही. त्यानंतर महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. पोलिसांना वाटलं की, काही वाईट होऊ नये. तेव्हाच महिला म्हणाली की, दरवाजा तोडून आत या. त्यानंतर पोलिसांना दरवाजा तोडला आणि ते आत आले.

पोलीस पोहोचल्यावर व्यक्ती दरवाज्यामागे लपला होता. त्याला पोलिसांनी हात वर करून बाहेर येण्यास सांगितलं. तेव्हा त्याने नकार दिला. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांच्यावरच हल्ला केला. शेवटी त्याला कसंतरी पोलिसांनी पकडलं. 

त्याला पकडल्यानंतर महिलेने पोलिसांना सांगितलं की, मेयोर्गा नावाच्या या तरूणाने त्यांचं भांडण सुरू असताना पाळीव अजगराचं शिर दाताने तोडलं. पोलिसांना दरवाज्यासमोर मृत अजगर आढळून आला. ज्यानंतर त्यांनी तरूणाला तुरूंगात टाकलं. 

Web Title: Man bites off pet python head by his teeth beheaded snake during fight with wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.