बाबो! कोरोना व्हायरसच्या भीतीने या पती-पत्नीने जे केलं ते वाचून व्हाल थक्क....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 01:34 PM2021-01-09T13:34:33+5:302021-01-09T13:36:43+5:30
इंडोनेशियातील एका व्यक्तीने फ्लाइटमध्ये प्रवास करण्यासाठी जे केलं जे वाचून तुम्ही थक्क व्हाल. यावरून तुम्हाला लक्षात येईल की, लोकांच्या मनात कोरोनाबाबत किती भीती आहे.
कोरोनाचं थैमान अजूनही जगात सुरूच आहे. अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. कोरोनाची लागण होऊ नये लोकांना सोशल डिस्टसिंग ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. हेच कारण आहे की काही लोक अजूनही प्रवास करण्यास घाबरतात. मात्र, इंडोनेशियातील एका व्यक्तीने फ्लाइटमध्ये प्रवास करण्यासाठी जे केलं जे वाचून तुम्ही थक्क व्हाल. यावरून तुम्हाला लक्षात येईल की, लोकांच्या मनात कोरोनाबाबत किती भीती आहे.
इंडोनेशियातील एका व्यक्तीने पत्नीसोबत सुरक्षित प्रवास करण्यासाठी कोरोनाच्या भीतीने पूर्ण फ्लाइटच बुक केली. जकार्ताच्या रिचर्ड मुल्जादीने एका विमानाचे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात तो आणि त्याची पत्नी दोघेच प्रवासी होते.
लोक कोरोना व्हायरसच्या भीतीने सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणं टाळत आहेत. इतकेच काय तर जर कुणी सोशल डिस्टंसिंग पाळत असेल, फेस मास्क लावत असेल, हॅंड ग्लव्स घालत असेल, सॅनिटायजर वापरत असेल तर लोक एकमेकांना संशयाच्या नजरेने बघतात.
याच भीतीला दूर करण्यासाठी रिचर्ड मुल्जादीने ही आयडिया लावली. रिचर्ज लक्झरी लाइफस्टाईलसाठी फेमस आहे. त्याने जकार्ताच्या बालीसाठी पत्नीसोबत उड्डाणे घेतलं. या आठवड्याच्या सुरूवातीलाच त्याने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ज्यात दिसतं की, पूर्ण विमान रिकामं आहे आणि त्यात तो त्याच्या पत्नीसोबत बसला आहे.
असं असलं तरी त्याने याचा खुलासा केला नाही की, या खाजगी उड्डाणासाठी त्याला किती खर्च आला. पण त्याने हे सांगितलं की, एका चार्टर प्लेनच्या तुलनेत पॅसेंजर विमानाचं बुकिंग स्वस्त होतं. रिचर्ड म्हणाला की, तो आणि त्याची पत्नी शाल्विन चांग व्हायरसमुळे घाबरलेले होते. लॉयन एअरलाइन्सने कथितपणे हे मान्य केलं आहे की, या विमानात केवळ रिचर्ड आणि त्याची पत्नी प्रवास करत होते. रिचर्ड हा इंडोनेशियातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक मानला जातो.