लूक बदलणं पडलं चांगलंच महागात; 21 लाख रुपये खर्च केले अन् तरुणाची झाली 'अशी' भयंकर अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 12:39 PM2022-02-25T12:39:31+5:302022-02-25T12:42:23+5:30
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचं ऐकल्यामुळे एका तरुणाची भयंकर अवस्था झाली आहे. अक्षरश: त्याची वाट लागली आहे.
टीव्ही किंवा सोशल मीडियावरील लोकप्रिय स्टार्सना पाहून आपणही असं दिसावं, यांच्यासारखंच असावं असं अनेकांना वाटतं. पण अनेकदा दिसतं तसं नसतं. त्यांच्या एका फोटोमागे लायटिंग, कॅमेरा, अँगल, पोझिशन आणि फिल्टरचा समावेश असतो. त्यांची नकल करणं किंवा त्यांच्यासारखं होण्यासाठी काही जण खूप प्रयत्न करतात. लाखो रुपये खर्च करणं पण असं करणं हे चांगलंच महागात पडू शकतं. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचं ऐकल्यामुळे एका तरुणाची भयंकर अवस्था झाली आहे. अक्षरश: त्याची वाट लागली आहे.
डरहममध्ये राहणारा डेल सेंट कलन (Dale Saint Cullen) ज्याने फिटनेस प्रेमी सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सच्या दबावात स्वतःची अवस्था करून घेतली. काहीच विचार न करता त्याने पाण्यासारखा पैसा घालवला आणि आपल्या शरीरावर चाकू-कात्री फिरवून घेतल्या. आता त्याच्यावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे. ऑनलाईन परफेक्शनच्या दुनियेत हा तरुण अडकला. त्याने आपल्या डोक्यात आपला एक चेहरा तयार केला आणि तसा नवा लूक मिळवण्यासाठी त्याने स्वतःवर बऱ्याच कॉस्मेटिक सर्जरी करून घेतल्या. यासाठी त्याने तब्बल 21 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केले.
वेगवेगळ्या देशात जाऊन सर्जरी करून घेतल्या. 28 वर्षांच्या डेलने चिन इम्लांट केलं. नाकासहित बऱ्याच प्लॅस्टिक सर्जरी करून घेतल्या. अधिक चांगला लूक मिळवण्याच्या नादात तो सर्जरीच्या जाळ्यात अडकला गेला. नेहमी काही ना काही नवं ट्राय करत होता. पण आता त्याला आपल्या या मूर्खपणाबाबत पश्चाताप होतो आहे. डेल आता पूर्णपणे बदलला आहे. वजनापासून चेहऱ्यापर्यंत त्याने सर्वकाही सर्जरीच्या माध्यमातून आपल्याला हवं तसं मिळवलं. पण त्यानंतर जे मिळालं त्यावर तो समाधानी, आनंदी नाही. इतर सोशल मीडिया युजर्सनी असं करू नये, असं आवाहन त्याने केलं आहे.
तुम्हाला तुमच्या शरीरासोबत असं काही करायचं आहे, तर आधी त्याची पडताळणी करून घ्या. सर्जन्स, प्रोसिजर, त्याचे परिणाम याची माहिती घेऊनच कोणतंही पाऊल उचला. कमीत कमी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर विश्वास ठेवून किंवा त्याच्या दबावात असा निर्णय घेऊ नका. डेल अद्यापही काही कॉस्मेटिक प्रोसिझर्स करतो आहे. पण आता पूर्णपणे पडताळणी केल्यानंतर माहिती मिळवल्यानंतरच तो असं करतो आहे, त्यामुळे त्याचा याचं काही वाटत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.