क्या बात! दोन महिलांचा जीव वाचवण्यासाठी या व्यक्तीने रोजा सोडून डोनेट केला प्लाझ्मा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 10:29 AM2021-04-17T10:29:17+5:302021-04-17T10:33:51+5:30
कोरोनाच्या थैमानात काही लोक माणूसकीला जपत दुसऱ्या लोकांची मदत करत आहेत. अकील अहमद त्यापैकीच एक व्यक्ती आहेत. रमजानचा पवित्र महिना सुरू आहे.
कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा देशभरात आपलं डोकं वर काढलं आहे. सतत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. लोक त्यामुळे हैराण झाले आहेत. हॉस्पिटल्समध्ये बेड मिळत नाही. एक्सपर्ट्सचा दावा आहे की, कोरोना व्हायरसचा आताचा स्ट्रेन आधीपेक्षा अधिक घातक आहे. अशातही काही लोक माणूसकीला जपत दुसऱ्या लोकांची मदत करत आहेत. अकील अहमद त्यापैकीच एक व्यक्ती आहेत. रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. अकीनने दोन महिलांचा जीव वाचवण्यासाठी जे केलं त्याने सर्वांचं मन जिंकलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटमध्ये छोटी सादडी गावातील ३६ वर्षीय निर्मला चार दिवसांपासून तर ऋषभदेव येथे राहणारी ३० वर्षीय अलका दोन दिवसांपासून भरती आहे. दोघींही तब्येत गंभीर आहे. दोघींचाही ब्लड ग्रुप एक पॉझिटिव्ह होता. दोघींनाही प्लाझ्माची गरज होती. (हे पण वाचा : सलाम! कोरोना रुग्णाची वेणी घालतानाचा डॉक्टरचा व्हिडीओ व्हायरल, दृश्य पाहून तुम्हीही व्हाल भावूक)
डॉक्टरांनी लगेच प्लाझ्माची व्यवस्था करण्यास सांगितले. यादरम्यान रक्त युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. ते प्लाझ्माच्या शोधात असताना त्यांना अकील मंसूरी यांची आठवण आली. कारण त्यांनी याआधी १७ वेळा रक्तादान केलं होतं. त्यांचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह असल्याचे माहीत होते. (हे पण वाचा: यवतमाळच्या अभियंत्याने साकारले बहुपयोगी व्हेंटिलेटर, केंद्र सरकारचीही मान्यता)
दोन्ही महिलांना ए पॉझिटिव्ह व्यक्तीच प्लाझ्मा देऊ शकत होती. कार्यकर्ता अर्पित कोठारी यांनी अकील यांना प्लाझ्मा देण्याची विनंती केली. मात्र, अकील यांनी रोजा ठेवला होता. तरी ते प्लाझ्मा डोनेट करायला पोहोचले. तर डॉक्टर म्हणाले की, रिकाम्या पोटी प्लाझ्मा घेऊ शकत नाहीत.
आधी रोजा तोडला नंतर निभावला धर्म
अलीक यांनी आधी आपला रोजा तोडला. नंतर त्यांनी अल्लाहचे आभार मानले. त्यानंतर नाश्ता केला. डॉक्टरांनी त्यांची अॅंटी बॉडी टेस्ट केली. नंतर त्यांचा प्लाझ्मा घेतला. हा प्लाझ्मा दोन्ही महिलांना देण्यात आला. अकील यांनी तिसऱ्यांदा प्लाझ्मा डोनेट केला आहे. ते म्हणाले की, दे अल्लाहकडे प्रार्थना करतील की, दोन्ही महिला लवकर ठीक व्हाव्यात.