बोंबला! शेजाऱ्याच्या घरात चोरी करायला घुसला शिक्षक, पकडल्यावर म्हणाला - 'कॉलगर्लचे पैसे द्यायचे होते'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 12:18 PM2021-04-02T12:18:18+5:302021-04-02T12:20:30+5:30
एडम तोंडावर मास्क लावून रात्री ११ वाजता शेजारच्या घरात घुसला होता. त्याच्या हातात एक धारदार वस्तूही होती.
ब्रिटनचा एक तरूण शिक्षक शेजारच्या घरात चोरी करण्यासाठी शिरला, मात्र त्याला घरातील व्यक्तीने लगेच पकडले. जेव्हा शिक्षकाची चौकशी केली गेली तेव्हा त्याने सांगितले की, तो या घरात चोरी करायला गेला कारण त्याला कॉल गर्लचे पैसे द्यायचे होते. या शिक्षकाला कोर्टाने सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
२७ वर्षीय एडम मॉरिसन हा सायन्सचा शिक्षक आहे. तो त्याच्या घरी दारू आणि ड्रग्सचं सेवन करत होता. इतकेच नाही तर त्याने कॉल गर्ललाही बोलवलं होतं. तिच्यासोबत संबंध ठेवल्यावर ती एडमकडे पैशांची मागणी करू लागली होती. मात्र, एडमकडे त्यावेळी पैसे नव्हते. त्यामुळे तो शेजारच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने शिरला.
एडम तोंडावर मास्क लावून रात्री ११ वाजता शेजारच्या घरात घुसला होता. त्याच्या हातात एक धारदार वस्तूही होती. या घरात राहणारे सॅम आणि ग्रेस झोपण्याच्या तयारीत होते. एडमला या घरात राहणारी महिला ग्रेसने पाहिलं आणि आपला बॉयफ्रेन्ड सॅमला जाऊन गपचूप सांगितलं. (हे पण वाचा : बोंबला! तोंड लपवून यूट्यूबवर कुकिंग व्हिडीओ टाकत होता ड्रग माफिया, एक चूक पडली महागात!)
यानंतर सॅम आणि एडममध्ये धक्काबुक्की झाली आणि एडमने सॅमला जखमी केलं होतं. मात्र नंतर सॅमने लवकरच एडमवर कंट्रोल मिळवला. एडमच्या खिशात त्याला ग्रेसचं अंतर्वस्त्रही आढळलं. त्याबाबत तो म्हणाला की, त्याला काही आठवत नाही. तेच ग्रेसला या घटनेनंतर धक्का बसलाय आणि जेव्हापासून ही घटना घडली तेव्हापासून घरात एकटी राहत नाही. (हे पण वाचा : बाबो! चोरीत सापडले लाखो रुपये, एवढे पैसे पाहून चोराला आला हार्ट अटॅक; त्यानंतर जे घडलं...)
याप्रकरणी एडमच्या वकिलांनी त्याला डिफेंड करताना सांगितले की, एडम एक शिक्षक आहे. त्याची आई एक सोशल वर्कर आहे आणि त्याच्या भावा-बहिणीची चांगली पोजीशन आहे. त्याला त्याच्या या वागण्याचा पश्चाताप आहे. त्याचा याआधी काहीही गुन्हेगारीचा रेकॉर्ड नाही. अशात त्याच्या शिक्षेवर विचार करायला हवा. मात्र, एडमचा सॅमवर हल्ला करणे, ग्रेसचे कपडे चोरी करणे आणि हिंसा याबाबत शिक्षेत कोर्टाने कोणताही बदल केला नाही.