स्वस्तात खरेदी केला जुना टॅंक, आत सापडलं असं काही ज्यामुळे बनला कोट्याधीश, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 11:25 AM2024-01-03T11:25:25+5:302024-01-03T11:25:52+5:30
तो रातोरात कोट्यावधी रूपयांचा मालकही झाला. पण त्यानंतर जे झालं त्याचा त्याला पश्चाताप असेल.
रातोरात श्रीमंत झालेल्या लोकांच्या अनेक गोष्टी समोर येत असतात. अशीच एक इंग्लंडमधील घटना आम्ही सांगणार आहोत. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या हाती जणू कुबेराचा खजिनाच लागला. या व्यक्तीने एक जुना टॅंक खरेदी केला होता. ज्यात त्याला हा खजिना सापडला. तो रातोरात कोट्यावधी रूपयांचा मालकही झाला. पण त्यानंतर जे झालं त्याचा त्याला पश्चाताप असेल.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, निक मीड (Nick Mead) 61 वर्षाचे आहेत आणि नॉर्थहॅप्टनशायरच्या हेल्मडॉन मध्ये त्यांचा एक फार्म आहे. त्यांना मिलिट्रीच्या वेगवेगळ्या गोष्टींची खूप आवड आहे. 2017 मध्ये त्यांना ई-बेवर एक जुना टॅंक दिसला होता. हा टॅंक सोव्हिएत टी-55 टॅंकची एक चायनीज कॉपी होता. कुवैतवर 1990 मध्ये हल्ला केला तेव्हा सैनिकांनी मोठी लूटमार केली होती. पण ते या टॅंकमधून खजिना काढणंच विसरले होते.
टॅंकच्या आत पाच सोन्याच्या वीटा होत्या. या वीटा बघून ते हैराण झाले. निक यांनी हा टॅंक साधारण 31 लाख रूपयांना खरेदी केला होता. तर त्या टॅंकमध्ये सापडलेल्या सोन्याची किंमत 21 कोटी रूपये होती. अशात जर त्यानी सोन्याच्या वीटा जवळ ठेवल्या असत्या तर त्यांचं नशीब चमकलं असतं. पण त्यानी असं केलं नाही. ज्याचा त्याना आजही पश्चाताप होत असेल.
डेली मेलसोबत बोलताना ते म्हणाले की, सोन्याच्या त्या वीटा त्यांनी प्रशासनाकडे सोपवल्या. पण त्याना आता पश्चाताप होत आहे की, गोल्ड बार शोधण्याचं त्याना ना बक्षीस मिळालं ना काही. रिपोर्टनुसार. जो हीवेस नावाच्या व्यक्तीने हा टॅंक ई-बेवर 31 लाख रूपयांना विकला होता. त्याने हा टॅंक बनवला होता. निककडे 300 मिलिट्री वाहनं आहेत.