हजारो रूपये खर्च करून हा तरूण खरेदी करतो तरूणींचे दुर्गंधी सॉक्स आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 04:38 PM2021-09-06T16:38:39+5:302021-09-06T16:39:20+5:30

या व्यक्तीचं वय ३३ वर्षे आहे. त्याने सांगितलं की, त्याला दुर्गंधी सॉक्स आणि घाणेरड्या पायाबाबत लोकांची धारणा बदलायची आहे.

Man buys dirty socks of girls to smell and taste them UK | हजारो रूपये खर्च करून हा तरूण खरेदी करतो तरूणींचे दुर्गंधी सॉक्स आणि मग...

हजारो रूपये खर्च करून हा तरूण खरेदी करतो तरूणींचे दुर्गंधी सॉक्स आणि मग...

Next

(Image Credit : Daily Star)

तुम्ही लोकांच्या अनेक अजब सवयींबाबत ऐकलं असेलच. पण ही बातमी तुम्हाला नक्कीच हैराण करेल. यूनायटेड किंगडमच्या हल शहरात एक अशी व्यक्ती आहे जो तरूणींचे घाणेरडे आणि दुर्गंधी येणारे सॉक्स खरेदी करतो. या व्यक्तीने सांगितलं की, तरूणींचे घाणेरडे सॉक्स त्याला आकर्षित करतात. या व्यक्तीने त्याची ओळख सांगितली नाही. त्याने मिस्टर डी नावाने ही सगळी माहिती दिली.

'द मिरर'मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, या व्यक्तीने मान्य केलं की, तो महिन्याला २०० यूरो म्हणजे साधारण १७,३३८ रूपये तरूणींचे घाणेरडे आणि दुर्गंधी सॉक्स खरेदी करण्यावर खर्च करतो. त्याला लोकांचे घाणेरडे आणि दुर्गंधी सॉक्स पसंत आहेत. तो पुढे म्हणाला की, त्याचं मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे चांगलं आहे. तो इतरांप्रमाणेच एक नॉर्मल मनुष्य आहे.

या व्यक्तीचं वय ३३ वर्षे आहे. त्याने सांगितलं की, त्याला दुर्गंधी सॉक्स आणि घाणेरड्या पायाबाबत लोकांची धारणा बदलायची आहे. लोकांना यांची दुर्गंधी पसंत नसते. पण त्याला ती आवडते. त्याने सांगितलं की, घाणेरडे सॉक्स खरेदी करण्यासाठी तो तरूणींना ऑनलाइन शोधतो आणि त्यांच्याशी संपर्क करतो. सॉक्सशिवाय तो इतरही वस्तू खरेदी करतो.

तो पुढे म्हणाला की, किती घाणेरडे सॉक्स किती रूपयांना घ्यायचे हे त्या तरूणीवर डिपेंड करतं. जर ती खास महिला किंवा सेलिब्रिटी असेल तर तो ते ६०-७० यूरो म्हणजे साधारण ५ हजार ते ६ रूपयांना घेतो. तो प्रयत्न करतो की, २१ ते ३८ वर्षाच्या महिलांचे सॉक्स खरेदी करतो. मिस्टर डी ने सांगितलं की, तो तरूणीच्या घाणेरड्या आणि दुर्गंधी सॉक्सचा वास घेतो. त्याला त्यांचा वास आवडतो.  
 

Web Title: Man buys dirty socks of girls to smell and taste them UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.