सुटे पैसे नव्हते म्हणून लॉटरीच तिकिट खरेदी केलं, झाला करोडपती! मिळाले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 08:04 PM2022-07-20T20:04:47+5:302022-07-20T20:07:25+5:30
केरळमधील एक सामान्य व्यक्तीही पैसे सुट्टे करता करता चक्क करोडपती झाली आहे.
काही खरेदी करायला गेल्यानंतर सुट्या पैशांची समस्या कधी ना कधी आपल्याला येतेच. कमी किमतीचं सामान घ्यायचं असतं आणि आपल्याकडे जास्त किमतीची नोट असते. काही वेळा विक्रेत्यांकडेही सुट्टे पैसे नसतात. अशावेळी आपण इतर विक्रेत्यांकडे सुट्टे पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो. केरळमधील एक सामान्य व्यक्तीही पैसे सुट्टे करता करता चक्क करोडपती झाली आहे.
केरळमधील 77 वर्षांच्या सदानंद यांचं नशीब फळफळलं आहे. ते सकाळी भाजी खरेदी करायला बाजारात गेले. पण त्यांच्याकडे 500 रुपयांची नोट होती. त्यांना त्याचे सुट्टे पैसे हवे होते. सुट्टे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी बरीच धडपड केली पण कुठूनच त्यांना सुट्टे पैसे मिळाले नाहीत. शेवटी त्यांनी त्या पैशांनी लॉटरी तिकीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून पैसे सुट्टे होतील.
सदानंद यांनी याआधीही बऱ्याच वेळा लॉटरीचं तिकीट खरेदी केलं आहे पण त्यांच्या नशीबाने साथ दिली नाही. यावेळी मात्र पैसे सुट्टे करण्यासाठी म्हणून त्यांनी लॉटरी तिकीट खरेदी केलं आणि त्यांना जॅकपॉटच लागला.
काही तासांतच त्यांना आपण लॉटरी जिंकल्याचं समजलं. त्यांना तब्बल12 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं. रिपोर्टनुसार इनकम टॅक्स कापल्यानंतर सदानंदला जवळपास 7 कोटी रुपये मिळतील. एका सामान्य व्यक्तीसाठी ही रक्कमही कमीन नाही. सदानंद यांनाही आपल्या नशीबावर विश्वास बसत नाही आहे.