अडल्ट स्टारच्या नखांसाठी एका व्यक्तीने मोजली इतकी रक्कम की पाहुन तिचा विश्वासच बसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 04:07 PM2022-05-06T16:07:22+5:302022-05-06T16:10:02+5:30
इंग्लंडच्या अडल्ट इंडस्ट्रीतील एका मॉडेलने सांगितलं की एकदा एका विक्षिप्त व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला. हा व्यक्ती तिच्या पायाची नखं खरेदी करण्याची इच्छा असल्याचं बोलत होता.
जगातील अनेक लोकांना वेगवेगळे छंद असतात. अनेकदा ते त्यांच्या विचित्र इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतात. अलीकडेच, इंग्लंडच्या अडल्ट इंडस्ट्रीतील एका मॉडेलने सांगितलं की एकदा एका विक्षिप्त व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला. हा व्यक्ती तिच्या पायाची नखं खरेदी करण्याची इच्छा असल्याचं बोलत होता.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, वेट्रेस म्हणून काम करणारी एक ट्रान्सजेंडर महिला अलेक्सिेस हीलीने नोकरी सोडली आणि अडल्ट इंडस्ट्रीचा मार्ग निवडला. तिने सब्सक्रिप्शन साइट्सवर कंटेंट तयार करण्यास सुरुवात केली. इंग्लंडमधील मँचेस्टर येथे राहणाऱ्या २८ वर्षीय अलेक्सिसने अलीकडेच वेबसाइटशी बोलताना सांगितलं, की एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधून विचित्र मागणी केली.
या व्यक्तीने महिलेकडे तिच्या पायाची नखं मागितली (Man Bought Toenails from Model for 9 Lakh Rupees). अलिक्सेसला वाटलं की तो व्यक्ती तिच्या नखांचा फोटो मागत आहे, म्हणून तिने अनेक अँगलने फोटो काढला आणि या व्यक्तीला पाठवला. पण नंतर तो म्हणाला की फोटो चांगले आहेत आणि त्याला ही नखं विकत घ्यायची आहेत. हे ऐकून अलिक्सेसला वाटले की तो मस्करी करत आहे पण अचानक त्या व्यक्तीने तिला ९ लाख रुपये पाठवले. अलेक्सचा क्षणभर विश्वासच बसेना. ती चुकीच्या पद्धतीने आकडे मोजत आहे का हे पाण्यासाठी तिने वारंवार वेबसाईट रिफ्रेश केली. मात्र, जेव्हा तिला खात्री पटली की हा व्यक्ती खरंच ९ लाख रुपये देत आहे, तेव्हा तिला समजलं की याला नखं गोळा करण्याचा विचित्र छंद आहे.
तिने खातरजमा करण्यासाठी या व्यक्तीला विचारलंही की तू ही रक्कम चुकून पाठवली आहेस का. यावर तो म्हणाला की ही तुझ्या सुंदर नखांची किंमत आहे. मग अलिक्सेसने आपली नखं एका छोट्या दागिन्यांच्या बॉक्समध्ये ठेवली आणि अनेक गोष्टींनी सजवली. तिने आपली नखं त्या व्यक्तीला कुरिअर केली आणि त्यानंतर या व्यक्तीने महिलेशी पुन्हा संपर्कही साधला नाही. अलिक्सेसने सांगितलं की, ज्या दिवशी तिला पैसे मिळाले, त्या दिवशी तिने स्वतःसाठी पिझ्झा ऑर्डर केला पण बाकीचे पैसे कशासाठी खर्च करायचे, हे तिला समजत नव्हतं. याशिवाय अनेकजण तिच्याकडे तिचा जुना टूथब्रश, केस तसंच इतर वस्तूही मागतात.