बाबो! ऑनलाइन ऑर्डर केलेल्या यूज्ड फ्रीजमध्ये सापडले ९६ लाख रूपये; रातोरात बनला लखपती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 02:13 PM2021-08-16T14:13:07+5:302021-08-16T14:21:42+5:30
एका व्यक्तीला ९६ लाख रूपये कॅश सापडले आहे तेही एका फ्रीजमध्ये. हा फ्रीज त्याने ऑनलाइन ऑर्डर केला होता. चला जाणून घेऊ काय आहे हे प्रकरण....
तुम्ही रातोरात लखपती किंवा कोट्याधीश झालेल्या लोकांचे अनेक किस्से ऐकले असतील. ज्यात कुणाची लॉटरी निघाली असेल तर कुणाला पैशांनी भरलेली बॅग सापडली. पण तुम्ही कधी ऐकलं का की, एका फ्रीजने एका व्यक्तीला लखपती बनवलं असेल. अशीच एक घटना समोर आली आहे. दक्षिण कोरियात एका व्यक्तीला ९६ लाख रूपये कॅश सापडले आहे तेही एका फ्रीजमध्ये. हा फ्रीज त्याने ऑनलाइन ऑर्डर केला होता. चला जाणून घेऊ काय आहे हे प्रकरण....
येथील एका व्यक्तीने एका यूज्ड फ्रीज ऑनलाइन ऑर्डर केला होता. ज्याच्या खालच्या भागात कुणीतरी टेपच्या मदतीने १.३० लाख डॉलर(९६ लाख रूपये) चिटकवले होते. ज्याबाबत त्याला काहीच अंदाज नव्हता. रिपोर्ट्सनुसार, ही व्यक्ती दक्षिण कोरियातील जेजू आयलॅंड य़ेथे राहणारी आहे. तेच पोलिसांनी सांगितलं की, या व्यक्तीने ६ ऑगस्टला कॅश सापडल्याचा सूचना दिली होती. (हे पण वाचा : वाह रे वाह! प्रेमविवाहात मदत केली म्हणून दोन भावांना मोठी शिक्षा, दंडाची रक्कम वाचून चक्रावून जाल)
त्याने पोलिसांना सांगितलं की, फ्रीजची सफाई करत असताना खालच्या भागात नोटांचे बंडल चिटकवलेले दिसले होते. एमबीसी न्यूजनुसार, पैसे ट्रान्सपरंट प्लास्टिक शीट्समध्ये गुंडाळून पॅक केले होते आणि टेपच्या मदतीने फ्रीजच्या खालच्या भागात चिटकवले होते.
महत्वाची बाब म्हणजे इतका पैसा मिळूनही या व्यक्तीने चुकीचा विचार केला नाही. त्याने सगळा पैसा पोलिसांकडे नेऊन दिला. पण अजूनही या व्यक्तीचा लखपती बनण्याचा मार्ग अजून बंद झालेला नाही. कारण दक्षिण कोरियाच्या कायद्यानुसार, जर हे पैसे घेण्यासाठी कुणी समोर येत नसेल तर तो सर्व पैसा त्याच व्यक्तीला मिळणार. फक्त त्याला २२ टक्के टॅक्स सरकारल द्यावा लागेल. त्यासोबतच जर या पैशांवर कुणी दावा केलाच आणि म्हणाला की, हा पैसा माझा आहे तरी सुद्धा ज्याला हे पैसे सापडले त्या व्यक्तीला बक्षीस म्हणून चांगली रक्कम मिळू शकते.